30 April 2025 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

फडणवीस अडचणीत? | राज्यातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगसस स्पायवेअर संदर्भात होता का? | हायकोर्टाचा सवाल आणि हे निर्देश...

Pegasus hacking

मुंबई, ०६ ऑगस्ट | महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगसस स्पायवेअर संदर्भात होता का? मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेत सवाल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगासस स्पायवेअर संदर्भात होता का? मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेत सवाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि जस्टिस जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी, डीजीआयपीआर आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस, राज्य सरकार सोबतच संबंधित अधिकाऱ्यांना 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर प्रकरण खोलवर गेल्यास फडणवीस देखील अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. कारण फडणवीस सरकारच्या काळात अधिकारी इस्राईल दौऱ्यावर गेले होते आणि फडणवीसांनी फोन टॅपिंग प्रकरणी CDR देखील अगदी सहज मिळवला होता. त्यामुळे त्यांना याची कल्पना होती का अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. विशेष म्हणजे पेगासस स्पायवेअर प्रकरण त्यावेळी प्रकाशझोतात आलं नव्हतं. मात्र असं काही अचानक देशपातळीवर उजेडात येईल याची कल्पना फडणवीसांना देखील नसावी आणि त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी फोन टॅपिंग CDR मिळवला, पण संशयाची सुई त्यांच्याकडे देखील जातं असल्याचं म्हटलं जातंय. यापूर्वीच तशी मागणी विरोधकांकडून पुढे आली आहे.

काँग्रेसचेही आरोप:
महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पेगासस कांड घडलं होतं का? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. सचिन सावंत यांनी ट्विट करून ही मागणी केली होती. पेगासस कांड महाराष्ट्रातही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून करण्यात आलेले अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगासस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्याही येत होत्या. कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का?, याची चौकशी करण्याची गरज आहे, असं सावंत यांनी म्हटलं होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: 2019 Israel Tour Of Maharashtra Officials To Acquire Pegasus Like Spyware Plea In Bombay High Court news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या