25 December 2024 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC
x

धक्कादायक! राज्यात ३६०७ नवे रुग्ण, तर १५२ रुग्णांचा मृत्यू

Covid19, Corona Virus

मुंबई ११ जून: राज्यात लॉकडाऊन नंतर रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ होत आहे. आज राज्यात ३६०७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ९७ हजार ६४८ म्हणजेच लाखाच्या जवळ गेली आहे. तर आज १५२ नव्या मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृत्यूचा आकडा ३५९० वर गेला आहे. आज १५६१ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आत्तापर्यंत राज्यात ४६०७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज झालेली रुग्णांची वाढ ही आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त वाढ आहे.

मुंबईत ९७ तर मीरा भाईंदर मध्ये ९ मृत्यूची नोंद झाली आहे. तर पुणे शहरात आज दिवसभरात २६८ जणांना कोरोनाची लागण झाली तर ७ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत ११ लाख घरं सील, ५० लाख लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये १५२ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये १०२ पुरुष तर ५० महिलांचा समावेश होता. १५२ मृ्त्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ८५ रुग्ण होते. ५४ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. तर १३ रुग्ण हे ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे होते. १५२ पैकी १०७ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार होते अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या आता ३५९० झाली आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी ३५ मृत्यू मागील दोन दिवसांमधले आहेत. तर उर्वरीत मृत्यू हे १ एप्रिल ते ८ जून या कालावधीतले आहेत.

 

News English Summary: The number of patients in the state is increasing dramatically after the lockdown. Today 3607 new patients were found in the state. Therefore, the total number of patients has gone up to 97 thousand 648, which is close to one lakh. So today 152 new deaths were recorded. So the death toll has gone up to 3590. Today 1561 patients were discharged.

News English Title: 3607 New Covid19 Cases 152 Deaths Reported In The State Today Taking The Total Number Of Positive Cases In The State To 97648 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x