22 January 2025 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

50 Khoke Ekdam Ok | शिंदे आपल्या समर्थक आमदारांना कानात 50 खोके घेतले आहेत ना, मग कशाला हवं मंत्रीपद? असं सांगतात

50 Khoke Ekdam Ok

CM Eknath Shinde | शिवसेनेतले आमदार फुटले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदार गुवाहाटीला गेले. त्यानंतर सत्ता स्थापन झाली आणि बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून गद्दार संबोधलं गेलं. इतकंच नाही, तर ५० खोके घेतल्याचा आरोपही शिंदे गटातल्या आमदारांवर सातत्यानं होतोय.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होऊन तीन महिने होत आली. नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार व्हायला एक महिना उशिर झाला होता. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार झाला होता. पण दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्यापही झालेला नाही. त्यामुळे सरकारवर वारंवार विरोधकांकडून निशाणा साधला जातोय.

विस्तार झाल्यास दुसऱ्याच दिवशी हे सरकार कोसळेल :
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झाला तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे सरकार कोसळेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना कानात 50 खोके घेतले आहेत ना, मग कशाला हवं मंत्रीपद? असं सांगत असल्याचा धक्कादायक दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रा :
मंत्रीपद मिळण्याबाबत आपसातल्या भानगडीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीय. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल. त्यामुळे हे सरकार कोसळण्याचीवेळ येईल त्याच्या महिनाभर अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल”, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 50 Khoke Ekdam Ok Eknath Khadse made allegation at Jalgaon check details 02 October 2022.

हॅशटॅग्स

#50 Khoke Ekdam Ok(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x