15 November 2024 9:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

औरंगाबादमध्ये १५ दिवसात ५० हजार कंत्राटी कामगारांनी नोकऱ्या गमावल्या

Aurangabad, Labors

औरंगाबाद: जागतिक मंदीचा फास घटवून असून यामुळे राज्यातील अनेक कंपन्या आपले उत्पादन थांबवत आहेत. औरंगाबादेतही अनेक कंपन्यांनी आपले उत्पादन क्षमता कमी केली आहेत. पंधरा दिवस गेल्या पंधरा दिवसात जवळपास ५० हजार कंत्राटी कामगारांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशी माहिती कामगार नेते उद्धव भवलकर यांनी दिली.

औरंगाबाद प्रामुख्याने ऑटो आणि मध्य हब म्हणून ओळखले त्याच्या आज हे दोन्ही उद्योग अडचणीत सापडले आहेत मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेली मध्यम व लघु उद्योग बंद पडले आहेत. वाळूज चिकलठाणा शेंद्रा रेल्वे एमआयडीसी आणि चिकलठाणा, चितेगाव या औद्योगिक क्षेत्रात विविध प्रकारचे अडीच हजार उद्योग आहेत. तेथे साडेचार लाख कामगार काम करतात. सध्या अंदाजे विविध कारणांमुळे त्यातील ५०० उद्योग बंद पडले. यात मागील १५ दिवसात तब्बल ५० हजार कामगारांना काढण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद स्कोडा, बजाज कंपनीवर अडीचशेहून अधिक ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगचे लघु मध्यम उद्योग अवलंबून आहेत. या मोठ्या कंपन्यांनी चार महिन्यापासून उत्पादन घटले आहेत. त्यामुळे लहान कंपन्या आणि उद्योग संकटात सापडले आहेत. निर्यातदार कंपन्याही अडचणीत डिस्टिलरी स्टिकर्स आणि टायर कंपन्यांवर ही मंदीचा परिणाम आहेत. वाळूजमध्ये बिके टी कंपनी उत्पादनापैकी ९०% टायर निर्यात करते , मात्र ही निर्यात ६० टक्क्यांनी कमी झाल्याने कामगारांकडून सांगण्यात येत आहे . तसेच वाळूज शेंद्रा चिकलठाणा येथील डिस्टिलरी कंपन्यांतून मोठ्या प्रमाणावर बिअर विदेशात जाते. परंतु तीही निर्यात घटल्याने या कंपन्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर उत्पादित साठा पकडून आहे.

दरम्यान, देशातील काही प्रसार माध्यमं जरी सरकारच्या ‘दरबारी’ बातम्या छापत असली देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक अवस्थेत असल्याचं समोर येत आहे. रोज एखाद्या अमुक क्षेत्रातील मंदीची बातमी प्रसिद्ध होतं आहेत. त्यात आता काही ऐतिहासिक विषयांची भर पडताना दिसत आहे. कारण आतापर्यंत रोजगाराच्या संबंधित जाहिराती वर्तमानपत्रात येणं तसं नवीन नाही. मात्र आता मोदींच्या राजवटीत थेट बेरोजगारीच्या जाहिराती झळकण्यास सुरुवात झाली आहे.

कारण टेक्सटाइल इंडस्ट्रीला बेरोजगारीसंबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्याची वेळ आली आहे. टेक्सटाइल मिल संघाने इंडियन एक्सप्रेसच्या तिसऱ्या पानावर बेरोजगारीसंबंधित जाहिरात छापली आहे. त्या जाहिरातीनुसार, भारतीय स्पीनिंग उद्योग मोठ्या संकटातून जातं आहे. त्यामुळे या क्षेत्रातील रोजगार वेगाने घटत आहे. त्यात नोकरी गेल्यानंतर फॅक्टरीच्या बाहेर पडणाऱ्या नोकरदारांचे फोटो देखील छापण्यात आले आहेत. त्यात लिहिल्या माहितीनुसार सध्या एक तृतीअंश मिल बंद झाल्या आहेत आणि ज्या अजून सुरु आहेत त्या प्रचंड तोट्यात चालत आहेत. सध्या त्या सुरु असलेल्या मिल कडे कापूस खरेदी करण्याची क्षमता देखील शिल्लक नाही. भविष्यात लागवड करण्यात येणाऱ्या कापसाला खरेदीदार देखील नसणार आहे. विशेष म्हणजे देशभरात सध्या ८० हजार कोटींच्या घरात कापसाचं पीक घेतलं जाणार आहे, मात्र त्याला खरेदीदार नसल्याने संबंधित कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी फरिदाबाद टेक्सटाइल एसोसिएशनचे अनिल जैन यांनी माहिती दिली की, टेक्सटाइल क्षेत्रात २५ ते ५० लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. आमच्या टेक्सटाइल एसोसिएशनला देखील यावर विश्वास ठेवणं कठीण होतं आहे. धाग्याच्या मिल देखील १ ते २ दिवस बंद ठेवाव्या लागत आहेत. तर धाग्याची निर्यात तब्बल ३३ टक्क्याने खाली घसरली आहे. त्यामुळे या आलेल्या आणि भविष्यत येऊ घातलेल्या भयानक स्थितीसंबंधित जाहिरात देणं भाग पडलं आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x