6 November 2024 4:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

कल्याण डोंबिवलीत आज ५६० नवे रुग्ण, रुग्णांची रुग्णवाहिकेतून गुरांप्रमाणे वाहतूक

New Corona, Kalyan Dombivali City, Covid 19

कल्याण-डोंबिवली, २ जुलै : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरुच आहे. आजची रुग्णसंख्या ५६० झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने ही माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवलीत उपचार घेत असलेल्यांची संख्या ४ हजार २६८ आहे. आत्तापर्यंत ३०९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

२९ जून रोजी रोजी ४३५ रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळले होते. तर ३० जून रोजी ४६२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. १ जुलै म्हणजेच बुधवारी ३५० रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळले होते. तर आज ५६० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून नागरिकांना अनेक सूचना करण्यात येत आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्स पाळण्यावर विशेष भर देण्यात येतो आहे. सरकारी बस, ट्रेन मध्ये देखील एका सीटवर एक प्रवासी, खाजगी वाहनांना देखील प्रवासी संख्येची मर्यादा घालून दिलेली आहे. असे असतांना, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना टाटा आमंत्रा याठिकाणी नेण्यासाठी एकाच रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत आहे.

कल्याण शहरातील कोरोना रुग्णांना रुग्णवाहिकेत घेऊन येत असताना ही रुग्णवाहिका कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा याठिकाणी आली. येथे एकाच घरातील दोन महिला रुग्ण रुग्णवाहिकेची वाट बघत होत्या. यावेळी रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडताच ही रुग्णवाहिका आधीच भरलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तरी देखील या दोन रुग्णांना याच रुग्णवाहिकेत बसविण्यात आले. अशाप्रकारे एकाच रुग्णवाहिकेत 8 ते 10 रुग्ण कोंबल्याने रुग्णांची सुरक्षा धोक्यात आली असून याला जवाबदार कोण असा सवाल नागरिक करत आहेत.

 

News English Summary: Corona’s havoc continues in Kalyan Dombivali. Today’s number of patients is 560. This information has been given by Kalyan Dombivali Municipal Corporation. At present, the number of people undergoing treatment in Kalyan Dombivali is 4,268.

News English Title: 560 New Corona Cases In Kalyan Dombivali City News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x