15 November 2024 5:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

राज्यात दिवसभरात ६४९७ नवे कोरोना रुग्ण, १९३ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Corona Virus, Covid 19

मुंबई, १३ जुलै : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात दिवसभरात 6497 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 60 हजार 924 इतका झाला आहे.

आज सोमवारी राज्यात 193 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात एकूण 10,482 जण दगावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.02 टक्के इतका आहे. सद्यस्थितीत राज्यात 1 लाख 5 हजार 637 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५५.३८ टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रातील मृत्यू दर ४.२ टक्के झाला आहे. आत्तापर्यंत १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १ लाख ५ हजार ६३७ केसेस अॅक्टिव्ह आहेत असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: The number of corona patients in the state is increasing rapidly. Today, 6497 new corona patients have been found in the state during the day. As a result, the number of corona victims in the state so far has reached 2 lakh 60 thousand 924.

News English Title: 6497 Covid19 Cases 4182 Discharged 193 Deaths Reported In Maharashtra Today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x