24 January 2025 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी 1 शेअर वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: REDTAPE Property Rights | 90% पुरुष मंडळींना माहित नाही, मुलींना लग्नानंतर वडिलांची संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा IREDA Share Price | इरेडा शेअर फोकसमध्ये, आनंद राठी ब्रोकरेज फर्मचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IREDA 8th Pay Commission | पेन्शनर्ससाठी मोठी बातमी, पेन्शनमध्ये 186 टक्क्यांनी वाढ होणार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी कमाईची मोठी संधी, प्राईस बँड सह डीटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

महाराष्ट्रात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत - मुख्य सचिव

Maharashtra, Corona Crisis, Covid 19, State Chief Secretary

मुंबई, २६ मे: महाराष्ट्रात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत अशी माहिती मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी दिली आहे. तसंच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३५ हजार १७८ ऍक्टिव्ह केसेस आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे पाचवरुन १४ दिवसांवर आलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. आज २४३६ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११८६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आज एका दिवसात राज्यभरातून ११८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक ९०० रुग्ण मुंबई मंडळात सोडण्यात आले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ५०१, ठाणे ३३७, पालघर १६, रायगड ४६, नाशिक ४, जळगाव, ३, पुणे १०९, सोलापूर २, कोल्हापूर ३, सांगली ३, रत्नागिरी ९, औरंगाबाद ९४, जालना २, हिंगोली १, लातूर १०, उस्मानाबाद २, अकोला १७, अमरावती ४ आणि नागपूर २३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

 

News English Summary: In Maharashtra, 80 per cent of corona patients are asymptomatic, said Chief Secretary Ajoy Mehta. He also said that at present there are 35 thousand 178 active cases in Maharashtra.

News English Title: 80 Of Cases Are Asymptomatic In The Maharashtra Says Ajoy Mehta Chief Secretary News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x