9 January 2025 8:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

वसईतील कोव्हीड सेंटरमध्ये सेंट्रलाइझ्ड एसीचा स्फोट | 13 रुग्णांचा मृत्यू - आ. हितेंद्र ठाकूर

MLA Hitendra Thakur

वसई-विरार, २३ एप्रिल: पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये एका कोरोना सेंटरला आग लागल्याने 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या कोरोना कंट्रोल रूमने याची पुष्टी लेली आहे. इतर रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या कोव्हीड सेंटरमध्ये एकूण 90 रुग्णांवर उपचार सुरु होते. आगीची ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजताच घडली असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षा विभागाला रात्री 3 च्या सुमारास ही आग लागली. या भीषण आगीमध्ये 13 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात यावेळी 17 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 13 रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या रुग्णालयात सेंट्रलाइझ्ड एसी होता, त्याचा स्फोट झाला. त्यावेळी आयसीयूत 17 रुग्ण होते. त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर आहेत. मी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. रात्री जवळपास दीड ते दोन वाजता ही घटना घडली. एकूण 90 रुग्ण होते. फायर ऑडिट वैगरे हा मुद्दा पुढचा आहे. मी आता इथे कोणाला काही मदत करता येते का हे बघायला आलो आहे. हे प्रश्न घेऊन बसणं किंवा मदत करणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आतमधील परिस्थिती वाईट आहे. एका स्फोटात 13 जणांचा मृत्यू होतो. याचा अर्थ दुसरा मजला हा पूर्णपणे जळून खाक झाला आहे, अशी माहिती वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

 

News English Summary: A fire at a corona center in Vasai in Palghar district has killed 13 patients. This has been confirmed by the Corona Control Room of Vasai Virar Municipal Corporation. The other patients have been shifted to a nearby hospital. A total of 90 patients are being treated at the Covid Center.

News English Title: A fire at a corona center at Vasai nearly 13 patients dead news updates.

हॅशटॅग्स

#Hitendra Thakur(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x