22 January 2025 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

गोपीचंद पडळकरांना पवारांविरोधातील वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल

NCP President Sharad Pawar, Gopichand Padalkar, Baramati FIR

बारामती, 25 जून : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीच्या निषेधार्थ आज (गुरुवार) पुण्यात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. मंडई परिसरात पडळकर यांचा पुतळा जाळून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी राज्यभर आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. तर बारामतीमध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. ‘जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या मांडणार’, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. अखेर पोलिसांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांच्यावर 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अमर धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.

 

News English Summary: The NCP has become aggressive against BJP MLA Gopichand Padalkar, who has been criticizing NCP President Sharad Pawar. The agitation is going on all over the state. A case has been registered against Gopichand Padalkar in Baramati.

News English Title: A statement was against NCP President Sharad Pawar a case was filed against Gopichand Padalkar at Baramati News latest Updates.

हॅशटॅग्स

#GopichandPadalkar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x