22 December 2024 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

कामचुकारपणामुळे महिलेला कामावरून काढण्यात आलेलं | संबधित महिलेवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल आहे

A woman accused, NCP leader Rajesh Vitekar, Sexual harassment, Parbhani

पुणे, ०१ एप्रिल: परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. राजेश विटेकर यांनी माझे अश्लील व्हीडिओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले. मी या सगळ्याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावेही आहेत. पण मला केवळ तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. तर राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही, असे सांगून मला घाबरवल्याचे या पीडित महिलेले म्हणणे आहे.

या महिलेने गुरुवारी पुण्यात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह पत्रकारपरिषद घेऊन आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या नव्या आरोपांमुळे महाविकासाघाडी सरकारच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा मिळाला होता. इंदुरीकर महाराजांविरोधातील खटला रद्द करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराजांच्या वतीने संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील करण्यात आलं होतं. हे अपील न्यायालयानं मंजूर केलं. संगमनेर दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात इंदुरीकर महाराजांनी अपील केलं होतं. याप्रकरणी इंदुरीकर महाराजांच्या वतीनं निकाल देण्यात आला होता.

याच प्रकरणात देखील तृप्ती देसाई यांनी मोठा पुढाकार घेतला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी हे प्रकरण पुढे आणण्यात देखील तृप्ती देसाईंचा पुढाकार दिसत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून विरोधक देखील सावध भूमिका घेताना दिसत आहेत. सामाजिक क्षेत्राचा अभ्यास असणाऱ्या मंडळींच्या मते तृप्ती देसाई यांच्या भूमाता ब्रिगेडची स्पर्धा ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत आहे. त्यामुळे देखील काही जणांनी यावर शंका उपस्थित केली आहे. इंदुरीकर महाराजांवरील खटला रद्द झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तृप्ती देसाई यांनी त्याबाबत कोणतीही दुसरी भूमिका घेतली आणि त्यानंतर दोनच दिवसांनी हे प्रकरण समोर आल्याने अनेकांना वेगळीच शंका आहे. विशेष म्हणजे तृप्ती देसाई यांनी बोलताना महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून पीडितांना बदनाम करण्याचं काम सुरु झालं आहे असा राजकीय शब्दप्रयोग केल्याने आणि शरद पवार केंद्रस्थानी ठेवल्याने देखील वेगळीच शंका उपस्थित होऊ लागली आहे.

राजेश विटेकरांची संस्था असणाऱ्या शाळेवर ही महिला शिक्षिका म्हणून कार्यरत होती. मात्र काम समाधानकारक नसल्याने या महिलेला कामावरून काढून टाकलं होतं. सध्या हे प्रकरण औरंगाबाद हायकोर्टात न्यायप्रविष्ट आहे. १५ मार्च २०२१’ला या महिलेवर परभणीतील सोनपेठ पोलीस ठाण्यात ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून त्या संबंधितांना अडकविण्यासाठी काही मार्ग शोधात होत्या असा आरोप स्थानिक पातळीवर होऊ लागला आहे.

संबंधित महिलेची बॉडीलँग्वेज, बोलण्याची पद्धत तसेच त्या सज्ञान शिक्षिका असताना देखील त्या खरचं अशा प्रकारेआमिषाला बळी पडू शकतात का अशी देखील शंका उपस्थित होऊ लागली आहे. विशेष म्हणजे वर्षभर पोलीस तक्रार दाखल करून घेत नसतील तर त्या 156 (3) अंतर्गत मॅजिस्ट्रेटकडे त्यांनी तक्रार करून ऑर्डर का नाही घेतली किंवा ऑनलाईन तक्रार का दाखल केली नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

 

News English Summary: A woman has accused NCP leader Rajesh Vitekar of sexual harassment in Parbhani. Rajesh Vitekar made pornographic videos of me and tortured me for a year. I had complained against all this. I also have all the evidence. But I’m just told the investigation is underway. According to the victim, Rajesh Vitekar scared me by saying that I will not be charged because of Sharad Pawar’s support.

News English Title: A woman has accused NCP leader Rajesh Vitekar of sexual harassment in Parbhani news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x