सरकार'कडे पैसा नाही, मी पीपीपी आणि बीओटी तत्वावर कामे केली: गडकरी

औरंगाबाद: सरकार कोणत्याही पक्षाचे असू द्या, सगळ्या गोष्टीचे सोंग करता येते, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. सरकारजवळ पैसेच नाहीत, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत दिली. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ)तर्फे ९ ते १२ जानेवारी दरम्यान ऍडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पो घेण्यात आला. याचा रविवारी समारोप झाला. यावेळी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी बोलत होते.
आमचे राजकारणी हरले की, आम्हाला हरवलं गेल असं सांगतात. आपण कुठं कमी पडलो हे ते बोलत नाहीत. दुसऱ्यांना दोष देतात. दुनिया झुकती है, लेकिन झुकानेवाला चाहिए, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वकीयांना मोलाचा सल्ला दिला आहे. औरंगाबादेत औद्योगिक प्रदर्शनाला गडकरींनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. पुढे गडकरी म्हणाले की, ‘कटआऊट लावून कुणी नेता होत नाही, मी आयुष्यात कधीही कटआऊट लावले नाही. तुमच्याकडे दर्जा असेल तर लोक तुमच्या सोबत असतील. राजकारणात सुद्धा असंच आहे.
मी जॉर्ज फर्नांडिस यांना आदर्श मानतो. मी विजयी झालो, तर माझ्या स्वागताला कुत्रं पण येत नाही. विमानतळावर स्वागताला यायची काय गरज आहे? मी माझ्या आयुष्यात २० रुपये खर्चून एकही बॅनर लावलं नाही, असंही गडकरींनी नमूद केलं. आपल्या देशाचा विकास होत असताना सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे असे आपण म्हणतो. तशी आर्थिक समानता सुद्धा तयार झाली पाहिजे , त्यामुळे गरीब पीडित माणसाला केंद्रबिंदू मानून आर्थिक धोरणे ठरवली पाहिजेत.आपल्या देशात गरिबी कमी करायची असेल तर रोजगार उपलब्ध केले पाहिजेत. असही ते म्हणाले.
यावेळी स्पेशल सेक्रेटरी मोहन मिश्रा, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, एक्स्पो समन्वयक सुनील किर्दक उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या एक्स्पोचे कौतुक करीत श्री.नितीन गडकरी म्हणाले, ”सरकारजवळ पैसा नाही. मी केंद्र सरकारच्या बजेवटर काम करीत नाही. गेल्या पाच वर्षांत १७ लाख कोटींची कामे केली, आगामी काळातील पाच वर्षांत १२ ते १५ कोटींचे रस्त्याचे काम करणार आहे. तुम्ही म्हणाल यासाठी पैसे कुठून आले. स्टेट बॅंकेचे चेअरमन माझ्याकडे आले. ५० हजार कोटी रूपये देऊन गेले. एलआयसीचे चेअरमन आले २५ हजार कोटी देऊन गेले.” सगळे बॅंकांचे चेअरमन आपल्या मागे लागल्याचे सांगत, पीपीपी आणि बीओटी तत्वावर ही कामे केल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title: Advantage Maharashtra Industrial Expo Union Minister Nitin Gadkari in Aurangabad.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल