23 February 2025 8:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

शिवराज्याभिषेक दिनी भगवा फडकवण्याला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांना भाजपाची फूस - हसन मुश्रीफ यांचा आरोप

Advocate Gunaratna Sadavarte

मुंबई, ०५ जून | मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारच्या आणखी एका निर्णयावर आक्षेप घेतला आहे. भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते असं मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलं आहे. ६ जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तशा प्रकारचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर सदावर्ते यांनी टीका करत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते आणि वकील जयश्री पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक लेखी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत असं म्हटलं आहे की, भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वज संहिता २००२-२००६ नुसार सरकारी कार्यालयावर फक्त राष्ट्रध्वज फडकवण्याची मुभा आहे. त्यामुळे भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते. उद्या कुणीही येईल निजामचा ध्वज लावा, मोगलांचा झेंडा लावा, पेशव्यांचा झेंडा लावा म्हणू शकतो, किंवा सम्राट अशोकाचा ध्वज फडकावा असेही म्हटले आहे.

दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवराज्याभिषेक दिनी भगवा फडकवण्याला विरोध केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा होणारच असं सांगत सदावर्ते यांना भाजपची फूस असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

उद्या (६ जून) होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आता 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना 1 जून रोजी तशा प्रकारचा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या होणारा शिवस्वराज्य दिन कसा साजरा करायचा यावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Opposing the Maratha reservation, Gunaratna Sadavarte has objected to another decision of the state government. Advocate Gunaratna Sadavarte has said that raising the saffron flag and singing the national anthem is treason, which could endanger the unity and integrity of the country. The state government has decided to celebrate Shivswarajya Day on June 6 by flying the saffron flag and similar orders have been issued to all government offices.

News English Title: Advocate Gunaratna Sadavarte has objected raising the saffron flag and singing the national anthem during Shivrajyabhishek Divas news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x