22 January 2025 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL
x

कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कोकण रेल्वेचे ५२ कर्मचारी क्वारंटाईन

Corona Konkan railway, 52 employee gets quarantined

मुंबई, १६ जून : मागील २४ तासांत राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात २७८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १७८ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यामध्ये मुंबईतील ५८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.

राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत सोमवारी १०६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९,२०१ इतकी झाली आहे. तर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १,१०,७४४ इतकी झाली आहे. यापैकी ५६०४९ रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आता ५० ते ५२ कर्मचारी क्वारंटाईन करण्याची वेळ कोकण रेल्वेवर आली आहे. या सर्वांना रत्नागिरी येथे क्वारंटाईन केले असून त्यांचीही कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. कोकण रेल्वेच्या सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशनचा एक कर्मचारी ९ जून रोजी कामानिमित्त रोहा, कोलाड येथे आला होता. त्याचवेळी रत्नागिरी येथील काही कर्मचारीदेखील तेथे गेले होते. दरम्यान, हा कर्मचारी मुंबईत परतल्यानंतर १३ जून रोजी त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

 

News English Summary: After the death of a Konkan Railway employee due to corona, now it is time for the Konkan Railway to quarantine 50 to 52 employees. All of them have been quarantined at Ratnagiri and will also undergo a corona test. An employee of Konkan Railway’s Signal and Telecommunication had come to Roha, Kolad on June 9 for work.

News English Title: After a death of employee by Corona Konkan railway 52 employee gets quarantined News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x