22 November 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज

Monsoon 2020, Maharashtra

पुणे, ११ जून : मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर मान्सून (Monsoon 2020) महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांमध्ये मान्सून सक्रिय झाल्याचं वृत्त वेधशाळेकडून देण्यात आलं आहे. मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केल्याचं चित्र आहे.

कोकणातील हर्णे, सोलापूरपर्यंत मान्सूनने मजल मारली असून संपूर्ण गोवा, कर्नाटक राज्यही व्यापले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला असून मान्सूनने गोवा आणि कोकण किनारपट्टी व्यापल्याची माहिती गोवा वेधशाळेकडून मिळाली आहे.

मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रावर ढगांची गर्दी होऊ लागली असून, मान्सननं आस्ते कदम महाराष्ट्रात पाऊल ठेवलं आहे. पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली आहे. याविषयी बोलताना पुणे वेधशाळेचे अनुपम कश्यपी म्हणाले,”मान्सूनचं आगमन झालं आहे. गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण मराठवाडा या भागातून मान्सून पुढे सरकत आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील पाच दिवसात राज्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. १२, १३, १४ जून या दिवसात चांगला पाऊस होईल, अशी माहिती कश्यपी यांनी सांगितलं.

 

News English Summary: After a long wait, Monsoon 2020 has finally arrived in Maharashtra. According to the observatory, monsoon has become active in Sindhudurg, Kolhapur, Sangli and Solapur areas of the state. Monsoon has made progress in Konkan, Central Maharashtra, Marathwada.

News English Title: After a long wait Monsoon 2020 has finally arrived in Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x