21 February 2025 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन करणार - अण्णा हजारे

Anna Hajare

नगर, १० सप्टेंबर | केंद्रात ज्या पद्धतीने लोकपाल कायदा झाला आहे, त्याच धर्तीवर राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा व्हावा, या मागणीसाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकार विरोधात आंदोलनाचा बिगुल दिला आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, त्यासाठी सशक्त आणि स्वायत्त लोकायुक्त गरजेचा आहे. पण सरकार सारखे चालढकल करत आहे, त्यामुळे येत्या दोन महिन्यात यावर सरकारने कार्यवाही न केल्यास या सरकारकडे पाहू, असे म्हणत अण्णांनी राज्य सरकारविरोधात आंदोलनाची तयारी सुरू केली असल्याचे आज शुक्रवारी राळेगणसिद्धी इथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन – Agitation against state government for corruption free Maharashtra said social activist Anna Hajare :

सज्ज रहा, कार्यकर्त्यांना आवाहन:
राज्यात आंदोलनाची तयारी सुरू करा, यासाठी जिल्हा, तालुका पातळीवर कार्यकर्त्यांना सूचना देण्यात येत आहे. शांततापूर्ण आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करायचे आहे, कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे, असा निरोप अण्णांच्या कार्यालयाकडून राज्यभरातील कार्यकर्त्यांना दिले जात आहेत.

दुसरीकडे अण्णा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येत्या दोन दिवसांत पत्र पाठवून देशातील भाजपाशासित राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा करावा, अशी मागणी करणार आहे. यावर अण्णां म्हणाले की, संसदेत मोदींनी माझ्या आंदोलनाचे कौतुक केले. चौदा दिवस मी उपोषण केले त्यानंतर लोकपाल कायदा संमत झाला, आता मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याच्या दिशेने पाऊल टाकावे आणि भाजपाशासित राज्यात लोकायुक्त कायदा संमत करून स्वायत्त लोकायुक्त नेमावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

देशातील आणि राज्यातील कुणाचेही सरकार असो, ते आंदोलनाला नव्हे, तर सरकार पडण्याला घाबरते. त्यामुळे शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले की जनसमुदाय मागे उभा राहतो. माहितीचा अधिकार, लोकपाल कायदा, असे अनेक आंदोलने केली आणि ती यशस्वी झाली. कारण जनमत आंदोलनाच्या पाठीशी उभे राहिले. सरकार पडेल, असे राज्यकर्त्यांना वाटले आणि लोकहिताचे कायदे करणे भाग पडले. त्यामुळे शांतता, संयम आणि अहिंसा या मार्गाने आंदोलन कार्यकर्त्यांनी करावे. सरकार आंदोलन मोडीत काढण्यासाठी तयार असते. मात्र, ती संधी सरकारला देऊ नका, असे आवाहन अण्णांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Agitation against state government for corruption free Maharashtra said social activist Anna Hajare.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Anna Hajare(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x