फडणवीसांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या | NCRB डेटा
मुंबई, ११ ऑक्टोबर : भाजपा सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचं थांबले नसल्याची स्थिती आहे. एनसीबीआरनं वर्ष २०१९मधील देशातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली असून, या आकडेवारीनं महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकली आहे. देशातील शेतकरी आत्महत्यांच्या क्रमवारीत दुर्वैवानं महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. देशात २०१९ या वर्षात दहा हजार २८१ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.
कृषी सुधारणांसह कर्जमाफी करत दिलासा दिल्यानंतरही महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याचं सत्र कायम आहे. काळजीची बाब म्हणजे देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. २०१९ या वर्षातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी एनसीआरबीनं जाहीर केली असून, त्यात देशात दहा हजार २८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचं म्हटलं आहे. यात एकट्या महाराष्ट्रात तीन हजार ९२७ म्हणजे जवळपास चार हजार शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळलं आहे.
“कृषी सुधारणांना चालना देण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. २००६ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात राज्यात कंत्राटी शेतीसह इतर शेतीविषयक सुधारणांची अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु राज्यातील १.५६ कोटी शेतकऱ्यांपैकी ५० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कंत्राटी शेतीचा लाभ घेतलेला नाही,” असं कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. “यानंतर सत्तेत आलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारनंही गट शेतीवर भर दिला. आर्थिक प्रोत्साहन १ कोटी रूपयांपर्यंत वाढवलं,” असंही अधिकाऱ्यांनं सांगितलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपानं ८९ लाख शेतकऱ्यांसाठी ३५ हजार कोटींची कर्जमाफी केली होती.
या कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नसल्याचं एनसीआरबीची आकडेवारी सांगते. राज्यात २०१४, २०१५, २०१६ आणि २०१९मध्ये ३ हजार ५०० पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. २०१७ व २०१८ या वर्षातील शेतकरी आत्महत्यांची एनसीआरबीनं नोंद केलेली नाही.
दुसरीकडे, महाराष्ट्रातील महिलांवरील गुन्ह्यांबाबत नुकताच एक अहवाल नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) जाहीर केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात महिलांसह सलग तीन वर्षांत सर्वाधिक सायबर स्टॉकिंग / धमकावण्याच्या घटनांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, २०१७ ते २०१९ या काळात महाराष्ट्रात २०५१ सायबरस्टॉकिंग / धमकावण्याचे प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जी संपूर्ण देशभरात नोंदविलेल्या एकूण घटनांपैकी एक तृतीयांश आहे. आंध्र प्रदेश १८४ प्रकरणांसह दुसर्या आणि हरियाणा ९७ प्रकरणे, म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२०१९ मध्ये महिलांविरुद्ध झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, देशात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. २०१९ मध्ये झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, देशात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटकमध्ये ५० टक्के गुन्ह्यांत वाढ होत २,६९८ इतके गुन्हे २०१९ मध्ये नोंदवले गेले आहेत. तर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २०१९ मध्ये १,५०३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. राज्यात २०१८ साली १२६२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. म्हणजेच २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये राज्यातील या गुन्ह्यांच्या संख्येत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
News English Summary: Maharashtra ranks first in the country in terms of farmer suicides. According to statistics, 10,281 farmers lost their lives in the country in the year 2019. The BJP, led by former chief minister Devendra Fadnavis, had written off Rs 35,000 crore for 89 lakh farmers. According to NCRB figures, farmer suicides in the state have not decreased even after the waiver. Statistics show that more than 3,500 farmers committed suicide in the state in 2014, 2015, 2016 and 2019. NCRB has not registered farmer suicides in 2017 and 2018.
News English Title: Agriculture Crisis Farmers Suicides Highest In Maharashtra says NCRB report Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY