3 December 2024 11:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

अहमदनगरमध्ये जिल्हास्तरीय बैठकीत भाजपमधील पक्षांतर्गत विरोधकांची हकालपट्टी

Ahmednagar politics

नगर, २६ जुलै | नेवासे तालुक्यातील शिवसेनेचे झापवाडी येथील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत असतानाच पक्षविरोधी कामे केल्याने नेवासे तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते अनिल ताके, माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य दिनकर गर्जे, माजी शहराध्यक्ष पोपट जिरे यांची पक्षातून हाकालपट्टी केली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी दिली.

भाजपची जिल्हास्तरीय बैठक नगर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार वैभव पिचड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसर्डा, जिल्‍हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, नेवासे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी आदी उपस्थित होते.पक्षाच्या विरोधात कोणी काम करत असेल, व त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असेल.

अशांना पक्षातून काढून टाका, असे स्पष्ट आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले. दरम्यान अहमदनगर येथे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नेवासे तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी स्वप्नील जरे, झापवाडीचे सरपंच तुकाराम जरे, युवा नेते अनिल जरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. नेवासे तालुका शिवसेनेत आलेले जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे कार्यशैलीला कंटाळून सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ahmednagar politics BJP expels opposition within the party news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x