24 December 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

भाजपला महाविकास आघाडीचा धक्का | सांगली, जळगाव पाठोपाठ भाजपने अहमदनगर महापालिका गमावली

Mahavikas Aghadi

मुंबई, ३० जून | याआधी अहमदनगर महापालिका निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. गतवेळी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी महापौरपदी बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौरपदी मालन ढोणे यांची निवड करण्यात आली होती. परंतु आता सांगली आणि जळगाव पाठोपाठ भारतीय जनता पक्षाने तिसरी महापालिका गमावली. अहमदनगर महानगरपालिकेतही महाविकास आघाडी पॅटर्न आल्याने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

अहमदनगर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. अहमदनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांची, तर उपमहापौरपदी गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोघांचेही एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या सभेत दोघांच्याही बिनविरोध निवडीची घोषणा केली.

या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी झाली. त्यामुळे दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज दाखल झाले होते. महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार नव्हता तर उपमहापौर पदासाठी देखील त्यांनी रस दाखवला नाही. त्यामुळे या निवड प्रक्रियेची केवळ औपचारिकता राहिली होती.

निवडीनंतर महापौर म्हणाले, ही औपचारिकता पीठासीन अधिकाऱ्यांनी पार पाडली. शहरातील महिलांच्या आरोग्यावर आणि पाणी प्रश्नावर काम करणार असल्याचं नवनिर्वाचित महापौरांनी सांगितलं तर शहराला हरित करण्यासाठी काम करणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ahmednagar Shivsena party Rohini Shendage becomes Mayor NCP Ganesh Bhosale Deputy Mayor news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x