25 December 2024 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Watch | आला रे आला 13 रुपयांचा स्वस्त IPO आला, झटपट मल्टिबॅगर कमाई होईल, संधी सोडू नका - IPO GMP Penny Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात गरिबांना करोडपती केलं, सतत पैशाचा पाऊस पाडणारा शेअर - Penny Stocks 2024 SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना
x

जलयुक्त शिवार SIT | तो तर फडणवीसांच्या चौकशीच्या आवाहनाला सरकारचा प्रतिसाद - खडसे

Jalyukta Shivar Yojana, Eknath Khadse, Devendra Fadnavis, Mahavikas Aghadi

मुंबई, १५ ऑक्टोबर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांमधील एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. ही योजना अपयशी असल्याचं कॅगने आपल्या अहवालात म्हटलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारने या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅगने ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा विचार करून जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्याचे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले. यासंदर्भात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अभियानाच्या अनुषंगाने चर्चा झाली तसेच कॅगचा अहवाल आणि सरकारकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून खुली चौकशी करावी यावर एकमताने निर्णय घेण्यात आला. जलयुक्त शिवारबाबत अनेक तक्रारी सरकारकडे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

त्यानंतर या योजनेत गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार असेल तर चौकशी करा, असे फडणवीसांनी स्वतःहून सरकारला आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारने या ठिकाणी चौकशी करायचे ठरवलेले आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. या योजनेत काही गैरव्यवहार असल्यास किंवा कोणी दोषी असल्यास तथ्य बाहेर येईलच, असेही एकनाथ खडसेंनी पुढे नमूद केले.

 

News English Summary: It was unanimously decided to hold an open inquiry considering the CAG report and the complaints received by the government. Chief Minister Uddhav Thackeray had said that the government has many complaints about water-rich Shivar. Fadnavis himself had appealed to the government to investigate if there was any malpractice and corruption in the scheme. In response to his appeal, the government has decided to conduct an inquiry in the area, said Eknath Khadse. Eknath Khadse further said that if there is any malpractice in the scheme or if anyone is guilty, the facts will come out.

News English Title: All facts will come to light in the investigation of Jalyukta Shivar Yojana says Eknath Khadse News Updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x