23 January 2025 4:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

अलमट्टी धरण: २००५ मध्ये आबां'नी जे धाडस दाखवलं ते फडवीसांना जमलंच नाही, अन्यथा?

karnataka, Almatti Dam, R R Patil, Sangali Flood, Kolhapur Flood

कोल्हापूर : मुसळधार पाऊस आणि धरणांतील विसर्गामुळे प्रमुख नद्यांनी धोक्याची लक्ष्मणरेषा ओलांडल्याने कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थिती गंभीर बनली असून अजूनही हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत. चार दिवसांनंतरही मदत न पोहोचल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तब्बल ७०८ गावांना गेल्या काही दिवसांतील पुराचा फटका बसला असून तब्बल २ लाख ४७ हजार जणांना विविध यंत्रणांद्वारे सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. राज्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, साताऱ्यातील गंभीर पूरपरिस्‍थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी संपर्क साधला आहे. येडियुरप्पा यांनी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाच लाख क्‍युसेक्‍स पाणी सोडून देण्याचे मान्य केले असून, यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्‍थिती आटोक्‍यात येण्यास मदत होणार आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. हे धरण भरले असल्याने बॅकवॉटरचा फटका कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना बसत आहे. असं असलं तरी देवेंद्र फडणवीसांकडून या परिस्थीतीकडे लक्ष जाण्यास महाजानदेश यात्रेमुळे खूपच उशीर झाल्याचं म्हटलं जातं आहे.

कर्नाटकातील सरकार पडताना महाराष्ट्रातील मंत्री जसे पहिल्या मिनिटांपासून कर्नाटकातील नेत्यांच्या संपर्कात होते तसे ते सांगली कोल्हापूरमधील पूर आपत्तीच्यावेळी नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळेच वेळीच उपाय योजना न झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. याच मूळ कारण म्हणजे कर्नाटकातील अलमट्टी धरण हे सांगलीपासून केवळ २०० किलो मीटरवर तर कोल्हापूरपासून २५० किलोमीटरवर आहे.

सन २००५ साली सांगलीत असाच महापूर आला होता त्यावेळी, तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबांनी कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला पुढे जाण्यासाठी जर वाट नाही करून दिली तर, आम्ही आमच्या राज्यातल्या धरणाचे सर्व दरवाजे उघडून सर्व पाणी कर्नाटकात घुसवू असा थेट इशाराच कर्नाटक सरकारला दिली होता. त्यावेळी तत्कालीन कर्नाटक सरकारने देखील त्याची दखल घेत, अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला वाट करून दिली आणि काही काळातच सांगलीतले जनजीवन पूर्ववत झाले होते. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी देखील योग्यवेळीच अशी भूमिका घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढणं गरजेचं होतं.

दुसरी गोष्ट म्हणजे, कुठलेही धरण हे जोपर्यंत १०० टक्के भरत नाही तोपर्यंत त्यातून पाणी सोडूच नये हि आपलपोटी, स्वार्थी प्रवृत्ती हि यासाठी जबाबदार आहे. धरणे ज्यावेळी ७० टक्के भरली त्याचवेळी त्यातून विसर्ग सुरु केला पाहिजे जेणेकरून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी वेळ मिळेल आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही. विद्यमान सरकारने योग्य वेळी पावलं ओळखली असती तर सांगलीच्या पूरपरिस्थितीत १६ जणांवर मृत पावण्याची वेळच आली नसती.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x