22 January 2025 1:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

BREAKING | नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्द | खासदारकी धोक्यात

MP Navneet Kaur Rana

मुंबई, ०८ जून | अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना मोठा धक्का बसला आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. न्यायमूर्ती बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ हायकोर्टात गेले होते. आनंदराव अडसूळांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निकाल दिला.

२०१३ मध्ये नवनीत कौर यांचा विवाह रवी राणा यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं. त्याची पडताळणी करण्यात आली होती. या प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयानं जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवलं. याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांनी अडसूळ यांचा पराभव केला. आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आज त्यावर निकाल सुनावण्यात आला. बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं कौर यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. याशिवाय त्यांना २ लाखांचा दंडदेखील ठोठावला. २०१९ मध्ये ज्या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली, तेच प्रमाणपत्र आता रद्द झाल्यानं राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे.

यानिर्णयामुळे नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा यांना देखील मोठा धक्का मानला जातोय. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेसाठी देखील ही मोठी आणि सकारात्मक बातमी आहे. नवनीत कौर राणा हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार का ते पाहावं लागणार आहे. जातीचा दाखला बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कागदपत्र द्यावी लागतात. विशेष म्हणजे नवनीत कौर राणा या अमरावती म्हणजे विदर्भातील असल्या तरी आमच्या नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मिळवलेल्या कागदपत्रांचं थेट कनेक्शन पालघर पर्यंत आहे आणि त्यात खोलवर गेल्यास अडचणीत अजून भर पडण्याची शक्यता आहे. कारण पालघरशी त्यांचा तसा कोणताही राजकीय संबंध नाही. शिवसेना यामध्ये खोलवर गेल्यास अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Amravati MP Navneet Kaur Rana has been hit hard. Rana’s caste certificate has been canceled by the Mumbai High Court. A bench of justices Bisht and Dhanuka passed the order. Rana had won the 2019 Lok Sabha elections. However, Shiv Sena leader and former MP Anandrao Adsul had gone to the High Court against his caste certificate. Today, the Mumbai High Court gave a big verdict on the petition of Anandrao Adsul

News English Title: Amravati MP Navneet Kaur Rana caste certificate canceled high court news updates.

हॅशटॅग्स

#Navneet Kaur Rana(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x