18 January 2025 6:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही'; अमृता फडणवीसांकडून उद्धव ठाकरे लक्ष

Chief Minister Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Amruta Fadnavis

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यात सत्तापालट झाल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमृता फडणवीस यांनी वारंवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना, ‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’ अशी घणाघाती टीका केली आहे.

तर हा उद्धव ठाकरेंचा द्वेष करणारा मजकूर फडणवीसांची मुलगी दिविजाने लिहिल्याची चर्चा होत आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, मी बंगला सोडताना कोपरा कोपरा पाहिलेला आहे. यामुळे तिने असे केलेले नाही, असे म्हटले आहे. तसेच हे आपल्याविरोधातील षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. तिथे स्टाफही राहतो. त्यांच्या खेळणाऱ्या मुलांपैकी कोणीतरी केले असेल. तर अमृता फडणवीस यांनी यावर खुलासा करताना आम्ही महिन्य़ापूर्वीच वर्षा बंगला सोडला आहे. बंगला सोडताना सगळं तपासलेले होते. त्यानंतर एकदाही तिथे गेलेलो नाही. हे लिखाण दिविजा किंवा अन्य कोणी केलेले नाही, असे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावरुन ट्विटरवर टीका केली होती. ‘राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय आहे! वीर सावरकर आणि त्यांची महानता किंवा सत्कार्यांच्या जवळपासही राहुल गांधी पोहचत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्यांनी स्वत:ला ‘गांधी’ समजण्याची चूकही करु नये! कोणीही गांधी आडनाव लावून ‘गांधी’होऊ शकत नाही!’ असं ट्वीट फडणवीसांनी केलं होतं.

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी समाज माध्यमांवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी तत्त्वनिष्ठ असावं लागतं”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.

 

Web Title:  Amruta Fadanvis again Targets Chief Minister Uddhav Thackeray.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x