26 December 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON
x

अर्थात प्रमाणपत्राची गरज लागते | अमृता फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Amruta Fadanvis, CM Uddhav Thackeray, Hindutva, Temples Reopen

मुंबई, १४ ऑक्टोबर : मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लेटर वॉर सुरू आहे. हिंदुत्वाची आठवण करून देणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी ‘माझ्या हिंदुत्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही,’ अशा शब्दांत सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या संघर्षावर प्रतिक्रिया आल्या. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

काल (मंगळवारी) रात्री अमृता फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य केलं. ‘वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकानं सुरू आहेत. मग मंदिरं डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते,’ अशा खोचक शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. आता यावर शिवसेना नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्यपालांनी पाठवलेल्या या पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीसारखी नाही तर राजकीय नेत्यासारखी आहे असा टोला पवार यांनी लगावला आहे. तसेच शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यपालांबाबत तक्रार केली आहे.

 

News English Summary: A letter war is going on between Governor Bhagat Singh Koshyari and Chief Minister Uddhav Thackeray over the opening of temples. The Chief Minister gave a blunt reply to the Governor reminding him of Hindutva, saying, “My Hindutva does not need anyone’s certificate.” This was followed by reactions from political circles to the struggle between the Chief Minister and the Governor. Now Amrita Fadnavis, wife of Opposition Leader Devendra Fadnavis, has tweeted about this. Amrita Fadnavis has targeted the Thackeray government.

News English Title: Amruta Fadanvis hits out at CM Uddhav Thackeray over reopening of temples News updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x