23 February 2025 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

'हम तो वो शक़्स हैं की, धुप में भी निखर आएँगे': अमृता फडणवीसांचा सेनेला टोला

Amruta Fadnavis, Shivsena, Twitter

नागपूर: ‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.

आज देवेंद्र फडणवीस यांच्या राहुल गांधी यांच्या आडनावावरील टीकेवर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी होय देवेंद्र हे खरे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला आहे. फक्त ‘ठाकरे’ आडनाव असून सुद्धा कोणी ‘ठाकरे’ होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीकाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय. महत्वाचे म्हणजे त्यांनी फडणवीस यांना दिलेल्या उत्तरात उद्धव ठाकरे, शिवसेना यांचे अधिकृत ट्विटर हँडलही टॅग केले आहे. या त्यांच्या विधानावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. या ट्विटवरून अमृता या ट्रोलही होऊ लागल्या आहेत.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या बोचऱ्या टीकेला शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली’, अशा शब्दांमध्ये अमेय घोले यांनी अमृता फडणवीसांना घणाघाणी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,’इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!’ एवढंच नाही तर अमृता फडणवीस यांच्यासाठी #आजच्याआनंदीबाई असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

आता शिवसेनेचे युवा नेता वरूण सरदेसाईंनी यांनी बोचरी टीका केली आहे. अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ ट्वीटला वरूण सरदेसाईने प्रत्युत्तर दिलं आहे. कालपासून हे ट्वीट नाट्य सुरू आहे. शिवसेनेचे युवा नेता वरूण सरदेसाईंनी अमृता फडणवीसांच्या ट्विटला रिट्वीट करून ‘मराठी बिग बॉसचे ऑडिशन कुठे सुरू आहेत का? विचारले आहे. तसेच माजी झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉल सारख्या गाण्याच्या कार्यक्रमालाही बोलवणार नसल्याचं म्हटलं आहे. बाकी बिग बॉससाठी चालू देत जोरदार…’ अशी बोचरी टीका केली आहे.

त्यावर आता फडणवीस यांनी आंदोलनाचा व्हिडीओ त्यांच्या फेसबुकपेजवर शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे अशा शायरीतून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर You don’t lead people by hitting people over the head, that’s assault – not leadership CM Uddhav Thackeray अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला चढवला आहे.लोकांच्या डोक्यावर मारून त्यांचे नेतृत्व करता येत नाही, तो हल्ला होते, नेतृत्वगुण नव्हे अशा शब्दांत आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा उल्लेख करून फडणवीस यांनी आपली पोस्ट सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.

Web Title:  Amruta Fadnavis against Target Shivsena party through Twitter.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x