27 January 2025 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

आज मला पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटतंय - अमृता फडणवीस

Amruta Fadnavis, corona vaccination, eligibility age

मुंबई, ७ एप्रिल: राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्रात योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरां त कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे. कोरोनाच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. कोरोना अधिक भयावह आहे” असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच COVID19, COVIDvaccine, COVIDSecondWave हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून वेगाने लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारनं देशात 45 वर्ष वयोगटावरील सर्वांना लसीकरणाला परवानगी दिली आहे.

 

News English Summary: Amrita Fadnavis tweeted about this from her Twitter account. “Today, for the first time in my life, I feel like I want to be 45 years or more. Waiting for the corona to be vaccinated. The corona is more frightening,” he tweeted. Also used are hashtags COVID19, COVIDvaccine, COVIDSecondWave. The country is ready to face the corona crisis and vaccination is in full swing. The central government has allowed vaccination in the country for all people above the age of 45 years

News English Title: Amruta Fadnavis talked on corona vaccination eligibility age criteria news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x