17 April 2025 2:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई, इंधन दरवाढ नव्हे, यासाठी त्या म्हणाल्या 'गर्व आहे मला भक्त असल्याचा'

Amruta Fadnavis

मुंबई, २८ जून | कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला मागे टाकत भारताने नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाची सुरुवात 16 जानेवारी 2021 रोजी तर अमेरिकेत लसीकरण अभियानाला 14 डिसेंबर 2020 रोजी सुरुवात झाली होती. भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल 32.36 कोटींचा मैलाचा टप्पा पार केला. उपलब्ध अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत 43 लाख 21 हजार 898 सत्रांमध्ये, एकूण 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 लसी देण्यात आल्या आहेत. तर गेल्या 24 तासात 17 लाख 21 हजार 268 लसी देण्यात आल्या आहेत.

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे. भारतात गेल्या 24 तासात 46 हजार 148 नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग 21 दिवस 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे. भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 5 लाख 72 हजार 994 इतकी आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लसीकरणात पहिल्यापासून देशात टॉप असून एकूण देशपातळीवरील लसीकरणात महत्वाची भूमिका बजावत आहे. असं असलं तरी अमृता फडणवीस यांना त्याबद्दल पहिल्यापासून गर्व वाटला नव्हता जो आता वाटू लागला. कारण आता विषय मोदी भक्तीचा असल्याचं दिसतंय आणि त्यासाठी जयजयकार होणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे मोदींच्या काळात अर्थव्यस्थेची झालेली ऐतिहासिक घसरण, प्रचंड बेरोजगारी, महागाई आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीत झालेली विक्रमी वाढ याबद्दल त्यांना त्यांच्या भक्तीचा कधीच अभिमान वाटला नाही. त्यामुळे सध्या भारताने लसीकरणात अमेरिकेला मागे टाकल्याने अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “हाँ ! मैं भक्त हूँ ! और मुझे गर्व है !

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Amruta Fadnavis tweet on corona vaccination record news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या