23 February 2025 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

पुढील चौकशी आपल्या हिंदू देवतांची आणि त्यांच्या भक्तांची? | बँकर मॅडमचं धार्मिक ट्विट

Amruta Fadnavis, Sachin Tendulkar, Lata Mangeshkar

मुंबई, ०८ फेब्रुवारी : केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा देणारे ट्विट केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यासारख्या सेलिब्रिटजनी ट्विट करत तिला प्रत्युत्तर दिले होते.

विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारला चांगलेच सुनावले आहे. ‘कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे’, असे संतापजनक ट्विट फडणवीसांनी केले आहे.

तसेच, “भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे.” अशी मागणी देखील फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी देखील याच विषयाला अनुसरून एक ट्विट केलं आहे, मात्र त्यांनी पहिल्यांदा धार्मिक उल्लेख देखील केला आहे. त्यांनी ट्विट करतं म्हटलं आहे की, “हे एकूण धक्का बसला की महाविकास आघाडी सरकारने भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत…केवळ यासाठी की त्यांनी शांतिपूर्वक एकी आणि शांती बद्दल ट्विट केलं…..चौकशीसाठी पुढचा नंबर हिंदू देवतांचा आणि त्यांच्या भक्तांचा?

 

News English Summary: International popstar Rihanna had tweeted in support of the ongoing agitation on the Delhi border against the new agriculture laws passed by the central government. After that, celebrities like Sachin Tendulkar, Lata Mangeshkar, Akshay Kumar tweeted and replied to her. Leader of Opposition and former Chief Minister Devendra Fadnavis has tweeted well to the state government.

News English Title: Amruta Fadnavis tweet on MahaVikas Aghadi govt after investigation of tweet made by Sachin Tendulkar and Lata Mangeshkar news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x