22 January 2025 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

VIDEO | कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक | भाजप कार्यकर्त्याने मुंबई भाजप अध्यक्षांची लायकीच काढली

MLA Mangalprabhat Lodha

मुंबई, १२ जून | भारतीय जनता पक्षात एकाबाजूला सत्ता गेल्यापासून आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यात दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना मुंबई भाजपचे वरिष्ठ नेते अपमानास्पद वागणूक देत असल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळे भाजपला याचा भविष्यात फटका देखील बसू शकतो.

विशेष म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून कटू अनुभव घेणारे भारतीय जनता पक्षाचे सामान्य कार्यकर्ते आता त्यांचयवर खुलेआम संताप व्यक्त करताना शेलक्या भाषेचा उपयोग करताना दिसत आहेत. त्यावरून भाजपमधील नेमकी स्थिती काय याचा अंदाज येऊ शकतो.

मुंबई भाजपमधील कार्यकर्ते संजय गिरगावकर यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा यांचा शेलक्या भाषेत समाचार घेतला आहे. मलबार हील भागातील एक कार्यकर्ता त्याच्या मुलीला घेऊन कोरोना लसीकरणासाठी गेला होता. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी हाकलून दिलं. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्याने संजय गिरगावकर यांना फोन करून घडला अनुभव सांगितलं आणि त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानंतर संजय गिरगावकर यांनी स्वतःच्या पक्षाच्या मुंबई अध्यक्षांचा चांगलाच समाचार घेतला. इतकंच नव्हे तर मंगलप्रभात लोढा यांची लायकी काढताना, कार्यकर्त्यांच्या पैशावर वडापाव खाणारा असं देखील म्हटलं आणि तुझी श्रीमंती घरी ठेव असं देखील सुनावलं आहे.

काय आहे नका व्हिडिओ;

 

News Title: Angry BJP karyakarta criticized  BJP MLA Mangalprabhat Lodha news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x