14 January 2025 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY
x

शिखर बँक: अण्णा हजारेंकडून शरद पवारांना क्लीन चीट

Anna Hajare, NCP Chief Sharad Pawar

अहमदनगर: शिखर सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी यांनी सदर विषयाला अनुसरून शरद पवारांना क्लीन चिट दिली आहे.

अण्णा हजारे म्हणाले की, राज्य सहकारी बॅँकेतील घोटाळ्याप्रकरणी कारवाईसाठी अनेकदा अधिकारी, पोलिसांकडे तक्रारी केल्या. मात्र कोणीही दखल घेतली नाही. त्यानंतर मुंबईतील रमाबाई आंबेडकरनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. तरीही पोलिसांनी चौकशी केली नाही. अखेर २००५ मध्ये उच्च न्यायालयात आवाज उठविला. उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अजित पवार व इतरांवर गुन्हे दाखल झाली असल्याचे त्यांना सांगितले.

हजारे यांनी आज राळेगणसिद्धी येथे या विषयावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकारणात शरद पवारांचे नाव कसं आलं मला माहीत नाही. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी. जे दोषी नाहीत, त्यांना विनाकारण अडकवू नये. मी दिलेल्या पुराव्यात शरद पवार यांचं नाव नाही. पण पुरावे देऊनही ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. माझ्याकडं शरद पवारांचे नाव नाही हे सत्य आहे . जे सत्य आहे ते सत्यच, खोटे आरोप करणे चुकीचे आहे, असंही हजारे म्हणाले.

तसेच राज्य बँकेतील घोटाळ्याप्रकरणी कॅगचे तीन चौकशी अहवाल, नाबार्डची समिती, नियम ८३, नियम ८८ सह २० चौकशी समितीच्या चौकशीत शरद पवार यांचे नाव कोठेही नसल्याचे अण्णा हजारे म्हणाले आहेत. त्यामुळे शरद पवार दोषी नाहीत त्यांना गुंतविणे बरोबर नाही. त्यामुळे जे खरे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी असल्याचे त्यांनी सप्ष्ट केले. तेसेच शरद पवारांच नाव कसं आलं कोणी घातलं हे त्यांनाच माहीत, आता सर्व चौकशी केली जाईल, त्यावेळी खरं काय आणि खोटं काय हे बाहेर येईल, असंही अण्णा हजारेंनी पत्रकार परिषदेत आज (गुरुवारी) सांगितलं आहे.

तसेच शिखर बँकेनं नियमबाह्य कर्जपुरवठा केला, त्यामुळे ती बँक डबघाईला आली. सहकारी बँकेनं कर्जपुरवठा करताना नियम धाब्यावर बसवले. त्याचबरोबर सहकारी बँक आणि साखर कारखाना यांचं कनेक्शन आहे. सहकारी साखर कारखान्यांना नियमबाह्य कर्जपुरवठा केला. साखर कारखाने आजारी पडले नाहीत, तर त्यांना आजारी पाडण्यात आले. ते कारखाने शिखर बँकेनं ताब्यात घेतले. त्यानंतर ते राजकारण्यांनी संगनमत करून कवडीमोल भावानं विकत घेतले. ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यातली दोन्ही वेगवेगळी प्रकरणं आहेत. या दोन्ही प्रकरणांची एकत्र चौकशी करण्याचं मत अण्णा हजारेंनी मांडलं आहे.

हॅशटॅग्स

#Anna Hajare(18)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x