22 January 2025 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
x

आनंदराज आंबेडकरांनंतर अण्णाराव पाटील यांनी देखील वंचित आघाडी सोडली?

Prakash Ambedkar, Annarao Patil, Anandraj Ambedkar, VBA, Vanchit Bahujan Aghadi

लातूर:  आनंदराज यांच्यानंतर लातूरचे अण्णाराव पाटील हेही प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर नसल्याचे समोर आले आहे. अण्णाराव पाटील हे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र लोकसभा- विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी वंचित आघाडीचा प्रवाह बळकट करण्याचा निर्णय घेतला. अण्णाराव पाटील यांनी भटके विमुक्त, ओबीसी समाज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी आपली ताकद वापरली. अण्णाराव यांच्याकडे ‘वंचित’च्या पार्लमेंटरी बोर्डाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ते कोल्हापूर अशी सत्तासंपादन यात्रा काढण्यात आली होती. प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही भुमिका घेवून पाटील राज्यभर फिरले होते. मात्र निवडणूक झाल्यापासून ते आंबेडकरांपासून अंतर ठेवून आहेत.

काही दिवसांपुर्वी प्रकाश आंबेडकर यांनी ‘भारीप’चे विलीनीकरण वंचित आघाडीत केले. त्यावेळीही अण्णाराव पाटील उपस्थित नव्हते. दुसऱ्या बाजूला अण्णाराव यांनी आपल्या मूळ पक्षाचे काम सुरू करून औरंगाबादमध्ये मेळावा घेतला. दोन दिवसांपुर्वी त्यांनी यवतमाळ- वाशिमच्या विधान परिषद निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देवून निवडणुकीत रंगत आणली आहे. महत्वाची बाब म्हणजे अण्णाराव हे हेलिकॉप्टर घेवून प्रचाराला गेले असल्याने नव्याने चर्चेत आले आहेत.

तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर यांनी आपली भविष्यातील भूमिका स्पष्ट केली होती. विशेष म्हणजे यावेळी आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचंही म्हटलं होतं.

पुढे बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले होते, “वंचित बहुजन आघाडीला आम्ही पाठिंबा दिला होता, पण वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे. वंचितला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाज वंचित आघाडीबाबत निराश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आलेले ओबीसी नेते हे खरे ओबीसी समाजाचे नेते होते का? हा प्रश्न आहे. त्यामुळे वंचित आघाडी समाजापर्यंत पोचली का हा देखील गंभीर प्रश्न आहे. वंचित सोबत जोडल्या गेलेल्या इतर घटकांचे मतदान वंचितला मिळाले का हा देखील मोठा प्रश्न आहे.”

लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर केवळ वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या किती जागा पडल्या यावरच चर्चा रंगली होती. त्यानंतर, विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्र्वादीने अनेक प्रस्ताव समोर ठेऊन देखील प्रकाश आंबेडकर आघाडीत सामील न होता, केवळ अवास्तव मागण्या करून ते चर्चेत राहिले. वंचित बहुजन आघाडी इतिहास रचनार असं काहीसं चित्र उभं करण्यात आलं.

परिणामी, काँग्रेस आघाडीला मदत करणारे आनंदराज आंबेडकर देखील वंचित बहुजन आघाडीत सामील झाले. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर वंचितला एकही जागा जिंकता आली नाही. इतकंच काय तर अकोल्यात देखील तेच चित्र पाहायला मिळालं. परिणामी, वंचित आघाडी केवळ भाजपाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करत असल्याचे आरोप होऊ लागले होते. निवडणुकीपूर्वीच वंचित’मधील इतर वरिष्ठ नेते देखील वंचितला सोडून गेले होते. मात्र त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी देखील वंचितला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीमुळे प्रकाश आंबेडकर यांची राजकीय हवाच निघून गेली आहे. त्यात जोगेंद्र कवाडे काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत असताना आणि रामदास आठवले सध्या भाजपमध्ये असून देखील शरद पवारांच्या घरी घिरट्या मारू लागले आहेत. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणामुळे वंचित राजकारणातून वंचितच राहणार असंच चित्र सध्या आहे, किंबहुना राहिलंच तर ते अकोला पुरतीच मर्यादित राहील असं चित्र आहे.

 

Web Title:  Annarao Patil may left Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi.

हॅशटॅग्स

#PrakashAmbedkar(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x