22 January 2025 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

पंकजांच्या नाराजी अस्त्राकडे प्रदेश पातळीवर दुर्लक्ष | बीडमध्ये पक्षांतर्गत पंकजा मुंडे विरोधी हालचाली सुरु - सविस्तर वृत्त

Pankaja Munde

मुंबई, २१ जुलै | केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डाॅ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यापासून मुंडे परिवार नाराज असल्याची चर्चा आहे. बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे देऊन आपली खदखद दाखवून दिली, तर पंकजा मुंडे यांनी मुंबईत समर्थकांचा मेळावा घेत सूचक विधाने केली हाेती. पाठाेपाठ साेमवारी भाजप ओबीसी माेर्चाच्या मुंबईत झालेल्या बैठकीसही पंकजा अनुपस्थित असल्याने त्याची अधिकच चर्चा झाली.

आपले नेते मोदी, शहा आणि नड्डा असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानत नसल्याचेच स्पष्ट केले. प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही मुंडे समर्थकांच्या नाराजी अस्त्राकडे दुर्लक्ष करून योग्य तो संदेश दिला. परिणामी मुंडे समर्थक जिल्ह्यातील विद्यमान ३ आमदारांपैकी एकही आमदार अथवा प्रमुख पदाधिकारी नाराजांच्या बैठकीत दिसला नाही. त्यामुळे मुंडे भगिनींचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात पक्षाच्याच नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली असून काही नेत्यांनी थेट पक्षातील इतर नेत्यांच्या भेटी घेत नव्या वाटा शोधायला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहेत.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही थेट दिल्लीत जाऊन महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांचे स्वागत केले. मुंडे भगिनी समर्थकांच्या नाराजी नाट्यात विद्यमान आमदार व काही पदाधिकाऱ्यानी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या दोन नेत्यांनी स्वतंत्रपणे थेट पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्याने भाजप अंतर्गत नेतृत्वाच्या नव्या वाटा शोधल्या जाऊ लागल्या आहेत.

भाजप ओबीसी सेलच्या बैठकीवर पंकजांचं उत्तर:
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्ही सक्रिय असताना या विषयाच्या मीटिंगला न बोलावण्याचे कारण काय? असा प्रश्न त्यांना माध्यमांनी एका मुलाखतीत केला. त्यावर पंकजा म्हणाल्या की, “ते मी कसं सांगू शकणार? मोर्चाच्या अध्यक्षांनाच विचारा. आंदोलन तेव्हाच यशस्वी होते जेव्हा लोक बोलणाऱ्या नेत्याचे ऐकतात. २६ तारखेच्या चक्का जाम आंदोलनासाठी पक्षाने मला जबाबदारी दिली, मी रस्त्यावर उतरले, निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली, सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. यापुढेही आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलने यशस्वी करू शकतो हे पक्षाला माहीत असल्याने नसेल बोलावले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Anti Pankaja Munde BJP politics is started in Beed district news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x