22 January 2025 10:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

कुणालाही भेटलो नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील - संजय राऊत

MP Sanjay Raut

मुंबई, ०४ जुलै | भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांना भेटल्याच्या वृत्ताचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी इन्कार केला आहे. मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. अशा अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने सुरू आहेत. ते दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार काल मुंबईत भेटल्याचं वृत्त पसरलं होतं. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचंही म्हटलं गेलं होतं. त्या वृत्ताचं आशिष शेलार यांनी इन्कार केला. आज राऊत यांनीही त्याचा इन्कार केला. अफवा पसरवल्या जातात. ज्यांना माझ्यापासून वेदना होतात, यातना होतात असे लोक अफवा पसरवत असतात. महाराष्ट्रात दोन वेगळ्या पक्षाचे नेते भेटले तर आश्चर्य वाटण्याचं कारण काय?, असा सवाल करतानाच मी काल दिवसभर कामात होतो. कुणालाही भेटलो नाही. तरीही अफवा पसरवण्यात आल्या. अशा अफवा पसरवल्याने राजकारण हलत नाही, अस्थिरही होत नाही. महाराष्ट्र सरकारला अडचणीही होत नाही. पण अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील, असं राऊत म्हणाले.

त्याचसोबत महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही, अफवेमुळे राजकारण हलणार नाही. माझ्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिलं पाहिजे. गोंधळ करणं म्हणजे रणनीती नाही. माझ्या बोलण्यानं, लिहिण्यानं त्रास झाला म्हणून अफवा पसरवल्या जातात. जनतेचे विषय मांडा, सभागृहात चर्चा करा. जेवढ्या अफवा पसरवाल तेवढं आम्ही मजबूत होऊ, माझ्यामुळे अडचणी निर्माण होणारे अशा अफवा पसरवत आहेत असा टोला संजय राऊतांनी नाव न घेता विरोधकांना लगावला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: No any kind of meeting with BJP MLA Ashish Shelar it was just rumours Said MP Sanjay Raut news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x