21 November 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News
x

१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्य सरकार कोर्टात गेलं तरी राज्यपाल म्हणाले 'राज्य सरकारचा आग्रह नाही' ?

Mahavikas Aghadi

पुणे, १५ ऑगस्ट | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज पुण्यातील विधान भवन येथे ध्वजारोहण पार पडले. यानंतर राज्यपाल उपस्थित अधिकारी आणि नेत्यांना भेटण्यासाठी गेले. यावेळी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न विचारला. तेव्हा राज्यपालांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले.

झेंडावंदन पार पडल्यानंतर राज्यपाल उपस्थित नागरिकांना भेटण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील होते. दरम्यान राज्यपाल खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्याजवळ पोहोचल्यानंतर 12 सदस्यांची नियुक्ती करा असे विचारत या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती रणपिसे यांनी केली. त्यावर राज्यपालांनी आपल्या खास शैलीत रणपिसे यांना उत्तर दिले.

अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत. याबाबत राज्य सरकार आग्रह धरत नाही, मग तुम्ही का धरता? याबाबतीत राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे’, अशा शब्दात राज्यपालांनी रणपिसे यांना सुनावले.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली. ते म्हणाले, की ’12 सदस्यांच्या नियुक्तीचा विषय कोर्टात गेला आहे. तसेच यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदीला देखील भेटलो होतो. आता तर कोर्टानेही यावर सूचक विधान केले आहे. त्यामुळे यावर अधिक काही बोलण्याची गरज नाही’.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Appointment of 12 MLAs governor Bhagat Singh Koshyari reply to congress-leader Sharad Ranpise in Pune news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x