28 January 2025 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

शुभं बातमी | राज्यात गेल्या ६ दिवसांत तब्बल ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले

Maharashtra corona pandemic

मुंबई, २७ एप्रिल | महाराष्ट्राला एक अत्यंत मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली होती. मात्र, आता एक सकारात्मक बातमी अशी की आज (२६ एप्रिल) राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. राज्यात आज 48 हजार 700 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आणखी एक चांगले वृत्त असे की, आज कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. राज्यात तब्बल 71 हजार 736 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दुसरीकडे, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून, सोमवारी सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. मंगळवारी लसीकरणाच्या आकडेवारीत आणखी वाढ होऊ शकते. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२६ एप्रिल) सांगितले. राज्यात गेल्या २ महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे.

आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, हि दिलासा देणारी बाब ठरली आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नविन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या असल्याने नागरिकांच्या मनावरील ताण काहीसा कमी होताना दिसून येत आहे.

गेल्या ६ दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
२० एप्रिलला ५४ हजार २२४ रुग्ण घरी सोडण्यात आले. त्यानंतर २१ एप्रिलला ५४ हजार ९८५, २२ एप्रिलला ६२ हजार २९८, २३ एप्रिलला ७४ हजार ४५, २४ एप्रिलला ६३ हजार ८१८, २५ एप्रिलला ६१ हजार ४५० आणि आज २६ एप्रिल रोजी ७१ हजार ७३६ असे एकूण ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

News English Summary: Maharashtra has received a huge relief. The ongoing corona devastation in the state in the last few days and the growing number of patients had raised concerns. However, the good news is that today (April 26) there is a sharp decline in the number of corona patients in the state. There was an increase of 48,700 corona patients in the state today. Another piece of good news is that the number of people who have been released from the corona today is huge. As many as 71,736 corona-affected patients have been released from corona in the state.

News English Title: As many as 71736 corona affected patients have been released from corona in the Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x