5 November 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

MPSC मायाजाल आहे यामध्ये पडू नका | सुसाईड नोट लिहीत MPSC उत्तीर्ण तरुणाची आत्महत्या

MPSC Exam

पुणे, ०४ जुलै | पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यात आता खळबळ उडाली आहे. आपल्या आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेली सुसाईड नोट मन हेलावून टाकणारी आहे. स्वप्निलने या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही. फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, MPSC मायाजाल आहे यामध्ये पडू नका.

२०१९ साली झालेल्या MPSCच्या पूर्व व मुख्य परीक्षांमध्ये स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनास्थितीमुळे दीड वर्षांपासून मुलाखत झालेली नव्हती. तसेच त्याने २०२० मध्येही पू्र्व परीक्षा दिली. त्यामध्येही तो उत्तीर्ण झाला. विविध जिल्ह्यातील निर्बंधामुळे मुख्य परीक्षा झालेली नाही. या तणावातूनच आपण आत्महत्या केल्याचे स्वप्निलने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. स्वप्नील आपले अभियांत्रिकीचे शिक्षण देखील पूर्ण केल्यानंतर MPSC परीक्षेची तयारी करत होता. आता अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येला नेमकं कोण जबाबदार ? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने सर्व गोष्टींबाबत त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे. आत्महत्येसाठी कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसल्याचे स्वप्निलने म्हटलं असून, अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या स्वप्निलने सुसाईड नोटच्या सुरुवातीलाच MPSC मायाजाल आहे, यात पडू नका असं आवाहन केलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MPSC aspirant Swapnil Sunil Lonkar suicide note competitive exams Pune News updates.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x