5 November 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

पुणे: कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णासाठी डब्यातून जेवणासोबत दारू सुद्धा पाठवली

Covid 19, Corona Center, Pune, Alcohol

पुणे, २५ मे: देशात महाराष्ट्र अद्यापही पहिल्या क्रमांकावर असून याठिकाणी काल दिवसभरात ३,०४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एकट्या मुंबईत कोरोनाचे १७२५ नवे रुग्ण आढळले. यासोबत राज्याने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३० हजाराच्या पुढे गेली आहे. राज्यात ५८ नव्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६३५ झाली आहे.

महाराष्ट्रातील मुंबई , ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड या ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, २२ मेरोजी येथील पॉझिटिव्ह दर ३१ टक्के होता. जो, १६ मेरोजी ४१ टक्के होता. पालघर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह दर २२ मरोजी वाढून ४२ टक्के झाला आहे. नाशकात तो ५ टक्के, तर रायगडमध्ये १३ टक्के आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित मुंबईमध्ये आहेत. येथे एकूण २७,००० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुण्यातही दिवसेंदिवस आकडा वाढत असताना इतर समस्या देखील उभ्या राहात आहेत. कारण पुणेकर कुठल्या गोष्टीवर कसा तोडगा काढतील याचा नेम नाही. एकीकडे पुण्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर अशाही परिस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी कोविड सेंटरवरच दारूच्या बाटल्या मागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील मिकमार कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. नानापेठेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. या रुग्णांना मिकमार कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. या रुग्णांसाठी त्यांच्या घरून जेवनाचा डबा येत असतो. आज सकाळी नानापेठेतील काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे जेवणाचे डबे आले होते. पोलिसांनी या डब्याची तपासणी केली असता आत चार दारूच्या बाटल्या आणि पत्याचा कॅट आढळून आला. जेवणाच्या डब्यासोबत दारूच्या बाटल्या पाहून पोलीस आणि पालिका प्रशासनही हादरून गेलं.

पोलिसांनी ज्या तरुणाने हा डबा आणला होता, त्याला चांगलाच काठीने प्रसाद देऊन आल्या पावली परत पाठवून दिले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा कोविड सेंटरमध्येच दारू पार्टीचा डाव होता. पण, गेटवर तपासणीमुळे हा डाव पोलिसांनी उधळून लावला.

 

News English Summary: In the morning, lunch boxes of some corona positive patients had arrived in Nanapet. Police searched the box and found four bottles of liquor and an address cat inside. The police and the municipal administration were shocked to see bottles of liquor along with the lunch box.

News English Title: At the Covid Center a relative brought alcohol for Corona patient in Pune News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x