15 November 2024 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

औरंगाबादमध्ये लोटसचं ऑपरेशन | भाजपचे माजी आमदार नितीन पाटील शिवसेनेत

Aurangabad, BJP, former MLA Nitin Patil, joined Shiv Sena

मुंबई, ०२ एप्रिल: महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून इतर सर्वच पक्षातील नेतेमंडळी राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत.

त्यात आगामी महानगरपालिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिका देखील सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्वाचीआहे. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेनं भाजपाला जोरदार धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय. माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाने महत्वाचे पदाधिकारी नितीन पाटील यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

यावेळी शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार हे सुद्धा या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते. औरंगाबादमध्ये घडलेल्या या मोठ्या घडामोडीनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलला देखील जोरदार धक्का बसला आहे. आगामी काळात औरंगाबाद जिल्हा बॅंकेची निवडणुक होणार आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणुक होण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये भाजपच्या नितीन पाटील प्रवेश केला आहे.

या पक्षप्रवेशाचा परिणाम परिणाम आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. नितीन पाटील यांच्या रुपाने शिवसेनेला सहकार क्षेत्रातील मोठा चेहरा मिळाला आहे.

 

News English Summary: Former MLA and important office bearer of Bharatiya Janata Party Nitin Patil has joined Shiv Sena in Mumbai in the presence of Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: Aurangabad BJP leader and former MLA Nitin Patil has joined Shiv Sena news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x