8 September 2024 5:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

मनसे 'हिंदुत्वा'मुळे शिवसेनेला खिंडार; सुहास दाशरथेंचा मनसेत प्रवेश

MNS Suhas Dashrathe, Raj Thackeray, Amit Thackeray, Shivsena, Aurangabad

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या मार्गाने गेल्याने शिवसेनेला धक्के लागण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल. मनसे आता हिंदुत्वाचा अजेन्डा हाती घेणार असल्याने शिवसेनेला सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे औरंगाबादचे सहसंपर्क प्रमुख तथा लोकसभा संघटक सुहास दाशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांच्या सहित त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

सुहास दाशरथे मागील ३९ वर्ष शिवसेनेत कार्यरत होते आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. दाशरथेंचा मनसे प्रवेश हा खैरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का असल्याची चर्चा औरंगाबादमध्ये रंगली आहे.

विशेष म्हणजे हिंदुत्वाच्या वाटेने गेल्यानंतर मनसेला फायदा होताना दिसत असून, शिवसेनेला सत्तेत असतानाही धक्के बसत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्यामुळे प्रवेश करणार असल्याचे सुहास दशरथे यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

शिवसेनेने कॉग्रेस-राष्ट्रवादी सोबत जात राज्याची सत्ता हस्तगत केल्यापासून अनेक जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. औरंगाबाद शिवसेनेतून त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली असून जुने कार्यकर्ते आणि सहसंपर्क प्रमुख असलेले सुहास दाशरथे लवकरच मनसेमध्ये प्रवेश करणार हे तेव्हाच राज ठाकरे यांच्या भेटीनंतर निश्चित झालं होतं.

त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, ‘मागील ३९ वर्ष मी शिवसेनेत काम करत आहे, पण पक्षाकडून माझ्यावर सातत्याने अन्यायच होत गेला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत सामील झाल्याने औरंगाबादमध्ये शिवसेना संकटात असल्याचं सूचित केलं होतं. दरम्यान, उद्याच्या महामोर्चाला देखील औरंगाबादमधून मोठया प्रमाणावर कार्यकर्ते येणार असल्याचं वृत्त आहे. त्यानंतर राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असून त्यावेळी औरंगाबादमध्ये शक्तिप्रदर्शन करून महानगरपालिका निवडणुकीच्या निमीत्ताने रणशिंग फूंकल जाणार आहे आणि त्यात थेट एमआयएम’ला शिंगावर घेण्याची योजना आहे.

 

Web Title:  Aurangabad Shvsena Leader Suhas Dashrathe join MNS in Presence of MNS Chief Raj Thackeray.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x