10 January 2025 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: BHEL Penny Stocks | कुबेर कृपा करणारा 75 पैशाचा पेनी शेअर, यापूर्वी 1775 टक्के परतावं दिला - Penny Stocks 2025 Bank Account Alert | 'या' बँक FD वर देतात घसघशीत परतावा; 9 टक्क्यांपर्यंत मिळेल व्याज, पैशाने पैसा वाढवा Itel Zeno 10 | इंटेल Zeno 10 स्मार्टफोन लॉन्च, किंमत केवळ 5999 रुपये, स्मार्टफोन मध्ये AI लेन्सचा देखील समावेश Property Tax Alert | प्रॉपर्टी टॅक्स वेळेवर भरले गेला नाही तर काय होते; प्रॉपर्टी टॅक्स विषयी 90% लोकांना ठाऊक नाहीत 'या' गोष्टी Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेजकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर ICICI सिक्युरिटीज फर्म बुलिश, पुढची टार्गेट नोट प्राईस करा - NSE: TATAPOWER
x

मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं | ते देणं सर्वस्वी केंद्र सरकारच्या हातात - माजी न्यायमूर्ती

Marathi actor Bharat Jadhav, CM Uddhav Thackeray, corona pandemic

मुंबई, २९ मे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार संभाजी छत्रपती यांच्यावर टीका केली आहे. ज्यावेळी संसदेत 102वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते. मग त्यांनी तोंड का उघडले नाही?, असा सवाल कोळसे-पाटील यांनी केला आहे.

माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी टीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना हा सवाल केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. मराठा समाजाला आरक्षण देणं हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या हातात आहे, असं सांगतानाच ज्यावेळी संसदेत 102 वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी संभाजीराजे संसदेत होते, मग त्यांनी तोंड का उघडले नाही?, असा सवाल कोळसे-पाटील यांनी केला आहे

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय खेळी खेळली जात आहे. संभाजीराजे ज्या मागण्या केल्याच सांगत आहेत, त्यातून फक्त मराठ्यांच्या नावाने राजकारण केलं जात आहे. असा आरोपही कोळसे-पाटील यांनी केला आहे.

दुसरीकडे, आजपर्यंत शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारने नेहमीच आपल्याकडची कुठलीही गोष्ट केंद्रावर ढकलायचेच काम केले. आताही मराठा आरक्षणासंदर्भात हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणत आहेत. हुकूमाची पानं त्यांच्या हातातच असतील तर मग तुमची गरजच काय, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

 

News English Summary: Maratha community should get reservation. It is in the hands of the central government to give reservation to the Maratha community, he said, when the 102nd Amendment was amended in Parliament. Sambhaji Raje was in Parliament at that time, so why didn’t he open his mouth ?, asked Kolse-Patil

News English Title: B G Kolse Patil statement on Maratha Reservation and Chhatrapati Sambhajiraje news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x