23 December 2024 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा
x

बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते, विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil

अहमदनगर, २३ जून: सामना अग्रलेखात केलेल्या टीकेचा भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर! या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखात विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती.

माझ्या बदनामीचे षड्यंत्र असून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चाही निरर्थक आहेत. या विरोधात आपण गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही आमच्या सुखदु:खाची चिंता करणारे मंत्री बाळासाहेब थोरात दोन वर्षापूर्वी भाजपामध्ये प्रवेश करणार होते, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे यांनी केला. त्यासाठी त्यांनी दिल्लीत कोणाच्या भेटी घेतल्या त्यांची नावे आम्हाला जाहीर करायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला. माध्यमांशी बोलतांना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

विखे पाटील म्हणाले, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या न झालेल्या भेटीची चर्चा जाणीवपूर्वक सुरु करुन मला बदनाम करण्याचा काहींचा हेतू आहे. या बदनामीकारक चर्चेच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. पक्षाला मिळालेल्या यशात थोरातांचे कर्तृत्व शून्य आहे. त्यांना सर्व अपघाताने मिळाले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यात काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. मागील साडेचार वर्षे थोरात गायबच होते.

दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी पत्रक प्रसिद्ध करून संजय राऊत यांना देखील प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये विखे-पाटील यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे काम निष्ठेने केले. आमची छाती फाडून पाहिली तर एकावेळी एकच नेता दिसेल. पण तुमची (संजय राऊत) छाती फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा एव्हान लोकांच्या लक्षात आला आहे. एकीकडे राजभवनाबद्दल धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून कुर्निसात करायचा हे कोलांटीउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच मी भाजपमध्ये आनंदी आहे. पण महाविकासआघाडीचा एका शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्रीदेखील करु न शकल्याचे दु:ख असेल आणि त्यातून आलेली अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल तर त्यात माझा काय दोष, असा खोचक सवाल राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला.

 

News English Summary: Even after leaving the Congress party, Minister Balasaheb Thorat, who was worried about our well-being, was about to join the BJP two years ago, said Radhakrishna Vikhe. For this, he warned us not to reveal the names of those whom he visited in Delhi.

News English Title: Balasaheb Thorat was about to join to BJP said Radhakrishna Vikhe Patil News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Radhakrishna Vikhe Patil(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x