17 September 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरची जादू, 1 वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 2.3 कोटी रुपये - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News
x

बारामतीमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर

Baramati lockdown

बारामती ०३ एप्रिल | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. बारामतीमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फक्त हॉस्पिटल व मेडिकल दुकानं आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं ठराविक वेळच खुली राहणार आहे.

बारामतीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. हा निर्णय प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज जाहीर केला आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी उद्या मध्यरात्री 12 वाजेपासून लागू करण्यात येणार आहे.

राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पुकारलेल्या वीकेंडला लॉकडाऊनला बारामतीत 100 टक्के प्रतिसाद मिळाला होता. मेडिकल आणि दूध विक्री वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. बारामतीत प्रत्येक चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची बारकाईने पोलिसांकडून चौकशी केली जात होती. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. इतकंच नाही, तर बारामतीत विनाकारण मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींची ॲंटीजेन तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

 

News English Summary: The number of coronary heart disease patients in the state is increasing day by day. The number of coronary heart disease patients has also increased in rural areas. A seven-day strict lockdown has been declared in Baramati to break the corona chain. Only hospitals and medical shops and grocery stores will be open from time to time.

News English Title: Baramati lockdown for 7 days declared by local body on corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x