22 January 2025 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

बीड डीसीसी बॅंक निवडणुक | धनंजय मुंडेंसमोर पंकजा मुंडेंनी आधीच पराभव मान्य केला?

Beed, DCC bank Election, Dhananjay Munde, Pankaja Munde

बीड, १९ मार्च: बीड जिल्ह्यातील राजकारण वेगाने बदलत आहे. बीड जिल्ह्यावर मंत्री धनंजय मुंडे यांचा प्रभाव वाढत असताना पंकजा मुंडे मात्र वारंवार आधीच पराभव मान्य करत असल्याचं पाहायला मिळतंय. सहकार क्षेत्रातील स्थान कमजोर झाल्यास पंकजा मुंडे यांचा भविष्यातील मार्ग देखील कठीण होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

उद्या बीड येथील डीसीसी बॅंकेची निवडणुक पार पडणार आहे. त्यात पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे असा सरळ सामना रंगणार असला तरी पंकजा मुंडे यांनी आधीच पांढरं निशाण फडकावल्याचं म्हटलं जातंय. त्याचं कारण ठरलं आहे पंकजा मुंडे यांनी याच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे डीसीसी बँक निवडणूक रिंगणातून मतदानाच्या काही तासांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या माजी ग्रामविकास आणि बालकल्याण मंत्री मंत्री पंकजा मुंडेंनी माघार घेतली आहे. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, डीसीसी बँक निवडणुकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सत्तेचा गैरवापर वापर केला. त्यामुळे ८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीवर भारतीय जनता पक्ष बहिष्कार घालत आहे. आम्ही केवळ लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणूकीकडे पाहत होतो. मात्र निवडणुकीत सत्तेचा गैरवापर होतोय. त्यामुळे निवडणुक प्रक्रियेवर पंकजा मुंडेंनी बहिष्कार टाकला आहे.

दरम्यान, मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेत पंकजांनी धनंजय मुंडेंच्या प्रभावामुळे माघार घेतली असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोर धरत असताना पंकजा मुंडे पळ काढल्याचं देखील म्हटलं जातंय. दुसरीकडे बहिष्कार टाकायचा होता तर उमेदवारी अर्ज का भरले ? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. यामुळे धनंजय मुंडे गटाचा प्रभाव वाढला आहे.पंकजा मुंडेंच्या या माघारीमुळे धनंजय मुंडे यांचे वर्चस्व मात्र दिसून येत असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.

 

News English Summary: Elections for DCC Bank in Beed will be held tomorrow. Though it will be a straight match between Pankaja Munde and Dhananjay Munde, it is said that Pankaja Munde has already raised the white flag. The reason is that Pankaja Munde has announced a big decision to boycott this election.

News English Title: Beed DCC bank Election minister Dhananjay Munde Vs Pankaja Munde news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x