बीडमध्ये शिवसंग्रामला धक्का | बडे नेते विनोद हातांगळे यांच्यासह १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत
बीड, ०९ फेब्रुवारी: बीडमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. काका- पुतण्याच्या राजकीय युद्धात आता शिवसंग्रामला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक शिवसेनेत गेल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवसंग्रामच्या एका बड्या नेत्याला फोडल्याने बीडमधील राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसंग्रामचे विनोद हातांगळे यांच्यासह तब्बल १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाल्याने शिवसंग्रामला मोठा धक्का बसला आहे. (Beed Shivsangram Vinayak Mete party members join NCP in presence of MLA Sandeep Kshirsagar)
बीड मतदारसंघात शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका पुतण्यात रस्सीखेच सुरू असते. अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यातच काही दिवसात राष्ट्रवादीच्या ४ नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का दिला होता.
बीड नगरपालिका निवडणुकीच्या डोळ्यासमोरच राष्ट्रवादीला धक्का बसल्याने संदीप क्षीरसागरांनी आता शिवसंग्रामच्या नेते- कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आ. विनायक मेटे यांना मोठा झटका दिला आहे. पेठ बीड परिसरात विनोद हातांगळे यांची मोठी पकड आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने हातांगळे यांच्यासह १५० कार्यकर्त्यांना जाहीर प्रवेश देऊन रिकामी झालेली पोकळी भरून काढली आहे.
News English Summary: The political climate in Beed is currently heating up. Uncle- Shiv Sangram has to bear a big blow in the political battle of Putanya. After 4 NCP corporators joined Shiv Sena, MLA Sandeep Kshirsagar fired a big leader of Shiv Sangram and changed the political equation in Beed. As many as 150 activists of Shiv Sangram, including Vinod Hatangale, have joined the NCP.
News English Title: Beed Shivsangram Vinayak Mete party members join NCP in presence of MLA Sandeep Kshirsagar news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC