ऊसतोडणी कामगारांनो गरज कारखानदारांना आहे | लक्षात घ्या - प्रकाश आंबेडकर
बीड, २५ ऑक्टोबर: बीडमध्ये एकाबाजूला ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस समोरासमोर आले आहेत. आमच्या ऊसतोड कामगारांना १५० टक्के, १०० टक्के, ७० टक्के वाढ नको तर कमीत कमी प्रति टनाला २१ रुपये वाढ द्या, असे आवाहन पवार साहेबांना केलं आहे. अंबेजोगाई येथील आज कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात मोठी घोषणा केली. यावर क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत. आमच्या ऊसतोड कामगारांना उद्या भगवान बाबांचे दर्शन घेऊन ऊसतोड करण्यासाठी कारखान्याला गाड्या भरण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटना, गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटना, तसंच माझ्यासहित ११ संघटनांच्यावतीने, मुकादमांचं कमिशन साडे १८ टक्क्कांवरुन ३७ टक्के करण्यात यावं, ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये १५० टक्के वाढ करण्यात यावी तसंच वाहतूकदरांची दरवाढ करुन ती दरवाढ ५० टक्के करण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. दरम्यान आम्हाला जोपर्यंत दरवाढ मिळत नाही तोपर्यंत ११ संघटनांचं आंदोलन सुरुच राहील, असा इशारा सुरेश धस यांनी दिलाय.सुरेश धस म्हणाले, तसंच साखर करखाना, मुकादम आणि ऊसतोड कामगार यांच्यातल्या व्यवहाराला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करुन द्यावी, अशीही मागणी असल्याचं धस यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे भगवान गडाच्या पायथ्याशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ऊस तोडणी कामगारांच्या मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये त्यांनी उसतोडणी कामगारांना कारखानदारांना गरज असल्याचे सांगितले. भगवान गड हे क्रांतीचे प्रतिक मानले जाते, ऊसतोडणी कामगारांनो गरज कारखानदारांना आहे, लक्षात घ्या, त्यामुळे आणखी 10 दिवस नाक दाबलेय ते तसेच ठेवा, असे आवाहन केले.
ऊसतोड कामगारांची मोठी अडचण होतेय. तुम्हाला शेतात काम नाही मिळाले तर रोजगार हमी योजना आहे. एकदा का अर्ज केला की तीन दिवसांत सरकारला रोजगार द्यावाच लागतो. नाहीतर रोजगार भत्ता द्यावा लागतो. यामुळे गरज साखर कारखानदारांना आहे. तुम्हाला नाही, असे त्यांनी ऊसतोड कामगारांना सांगितले. तसेच सातारा, सांगली भागात उसाच्या शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे. तेथील लोकच कंटाळले आहेत. आपल्यापैकी काही कामगारांना कारखानदारांनी जबरदस्तीने उचलून नेले आहे. त्यांचे काही व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. त्यांची अवस्था पाहिली असलाच. त्यांना रहायलाही जागा नाहीय. यामुळे आणखी काही दिवस थांबा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
मशीन सहा इंच वरून ऊस कापते आणि जर खोडापासून कापला गेला तर साखर अधिक मळली जाते. यामुळे कारखान्यांनी किती जरी मशीन आणायचा प्रयत्न केला तर तो असफल होणार आहे. यामुळे कारखानदार कामगारांना कधीच सोडणार नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले. जर तुम्हाला उचलून नेत असतील तर वाटेत दिसणाऱ्या पोलिसाला हाक मारा, हात दाखवा आणि त्यांना सांगा हे जबरदस्तीने नेत आहेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
News English Summary: Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar, who is deprived of the base of Bhagwan Gad, has organized a gathering of sugarcane workers. In it, he said that sugar factories need sugarcane workers. Bhagwan Gad is considered to be the symbol of revolution, sugarcane workers are need of sugar factories, mind you, so keep your strike continue for next 10 days, he appealed.
News English Title: Beed Sugarcane workers hold their noses for another ten days Prakash Ambedkars advice News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा