16 April 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

मोदी-उद्धव ठाकरे भेटीपूर्वी काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर शरद पवारांसोबत चर्चा

Maratha reservation

मुंबई, ०८ जून | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज म्हणजे ८ जूनला दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.मराठा आरक्षण,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण,जीएसटी परतावा,लसीकरण अशा अनेक मुद्यांवर ही भेट आहे.या भेटीआधीचं उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. शरद पवारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. मराठा आरक्षणाबाबत ठाकरे आणि मोदींची भेट होतेय या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची आहे. याशिवाय या भेटीमध्ये महाराष्ट्रातील महामंडळावरील नियुक्त्यांबाबतही चर्चा झाली असावी.

मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंकडे असलं तरी महाविकासआघाडीचा रिमोट शरद पवारांच्या हातात आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाची चर्चा होणार साहजिक आहे. महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत केंद्र सरकरशी नेमकी काय चर्चा करायची याबाबत पवार-ठाकरे भेटीमध्ये चर्चा होऊ शकते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाविषयी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी पवारांची भेट घेतली. महाराष्ट्राचे एक शिष्टमंडळ मोदींची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्र्यांबरोबरच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा समावेश असून ८ जून रोजी ते मोदींची भेट घेणार आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा:
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी सात वाजता मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ मुंबईहून विमानाने दिल्लीकडे रवाना होतील. सकाळी पावणे दहाच्या सुमारास हे शिष्टमंडळ महाराष्ट्र सदन येथे पोहचले. त्यानंतर सकाळी ११ वाजता पंतप्रधानांसोबत लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवासस्थानी हे शिष्टमंडळ मोदींची भेठ घेईल. बैठकीनंतर लगेच हे शिष्टमंडळ विमानाने मुंबईकडे रवाना होईल.

 

News English Summary: According to the Chief Minister’s Office, the Chief Minister and his delegation will leave Mumbai for Delhi at 7 am. The delegation reached Maharashtra Sadan around 10 in the morning. After that, the delegation will meet Modi at 11 am at the PM’s residence at Lok Kalyan Marg. Immediately after the meeting, the delegation will fly to Mumbai.

News English Title: Before meeting between PM Narendra Modi and CM Uddhav Thackeray NCP chief Sharad Pawar meet CM Uddhav Thackeray at Varsha Niwas news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या