13 January 2025 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025 IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025
x

मी तर भरपूर खाज असलेला खासदार आहे | उदयनराजेंची टोलेबाजी

Bharatiya Janata Party, MP Udayan Raje Bhosale, Grade separator, Satara

सातारा, १९ जानेवारी: भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. यावेळी उदयनराजे यांनी जोरदार फटके बाजी केली आहे. ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासाठी मंत्रीच कशाला हवेत. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे, अशी जोरदार फटकेबाजी उदयनराजे यांनी केली आहे.

साताऱ्यातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात आले आहे. त्याचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावरून टीका होत असतानाच उदयनराजे यांनी त्यावरून जोरदार फटकेबाजी केली. मंत्र्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचं असा काही कायदा आहे का? ते मंत्री असले तरी आधी आमदार आणि खासदार आहेत ना. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही. भरपूर खाज असलेला खासदार आहे, असं त्यांनी सांगितलं.

ग्रेड सेपरेटरच्या कामलाा उशिर झाल्याबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी त्यांच्या खास अंदाजात फटकेबाजी केली. काम करताना… एक लक्षात घ्या… थोडा त्रास होणार. पोरंही एका दिवसात होत नाहीत. नऊ महिने लागतात… त्रास तर होतोच… त्रास झाल्याशिवाय मुलंही होत नाहीत… हे तर ग्रेड सेपरेटर आहे, थोडा त्रास तर होणारच, असा चिमटाही त्यांनी काढला.

 

News English Summary: Bharatiya Janata Party MP Udayan Raje Bhosale inaugurated the grade separator today. This time, Udayan Raje has hit hard. Why a minister for the inauguration of a grade separator. I am also an MP. And not an MP like that, but an MP with a lot of itching, said Udayan Raje.

News English Title: Bharatiya Janata Party MP Udayan Raje Bhosale inaugurated the grade separator today in Satara news updates.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x