21 November 2024 3:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News
x

आधी शिवसेना संपल्याची दिल्लीत माहिती देणाऱ्या राज्यातील नेत्यांना दिल्लीत बोलवलं, शिवसेनेच्या विराट दसरा मेळाव्याने भाजपमध्ये चिंता

Shivsena

Andheri East By Poll Election | एकनाथ शिंदेंच्या यांच्या बंडानंतर शिवसेना संपल्याची माहिती देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठांना दिली होती. मात्र दसरा मेळाव्यात शिवसैनिकांचा जनसागर शिवतीर्थावर धडकला आणि बाळासाहेबांचे विचार शिवसेनेत किती खोलवर रुजले आहेत याचा प्रत्यय दिल्लीतील भाजप नेत्यांना आल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. तसेच गोरेगाव येथे गटप्रमुखांचा मेळावा आणि तिथल्या उपस्थितीने मुंबई भाजपाला धडकी भरली होती अशी माहिती भाजपच्या अंतर्गत गोटातून मिळाली होती. त्यानंतरच शिंदे गटाला आदेश देऊन जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे यांना आता गटप्रमुख आठवू लागल्याचा पाढा वाचण्याचे आदेश दिले होते असं वृत्त आहे. अनेक राज्यात भाजपच्या जागा कमी होणार आहेत आणि त्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतके प्रचंड प्रमाणात पदाधिकारी आणि शिवसैनिक असतील तर लोकांचा पाठिंबा किती असेल यावरून चिंता व्यक्त करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक राजकीय अडचण देवेंद्र फडणवीस यांची झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. त्यात प्रसार माध्यमांवर पुराव्यानिशी शिंदेंच्या दसरा मेळाव्याचे वास्तव उघड झाल्याने फडणवीसांचं ‘शिंदे बंडखोरी’ राजकारण पूर्णपणे फसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अजून उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यासाठी बाहेर पडलेले नाहीत आणि त्यांचे दौरे सुरु झाल्यावर मोठ्याप्रमाणावर सहानुभूती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपाची काळजी अजून वाढली आहे. तसेच शिंदेंची भाषण शैली लोकांच्या पचनी पडली नसल्याने ते किती आमदारांना निवडून आणतील यात भाजपाने शंका व्यक्त केली आहे. तसेच आता शिंदेंच्या बंडाचा फटका भाजपाला देखील बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील नेत्यांना दिल्लीत बोलाविण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईतील अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीचा बहाणा करून भाजप नेत्यांना दिल्लीत बोलाविण्यात आलं आहे. मात्र वास्तव वेगळं असून भाजपचं ‘शिंदे राजकारण’ फासल्याची भाजपाला खात्री पटली आहे आणि यावर वरिष्ठ पातळीवर चिंता व्यक्त करण्यात आल्याचं वृत्त आहे. परिणामी आता शिंदेंचा ‘धनुष्यबाण’ मिळविण्यापेक्षा तो गोठवता कसं येईल यावर शिंदेंना लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे आणि त्यानुसार दसरा मेळाव्यानंतर हालचाली सुरु झाल्या आहेत.

आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लागली आहे. ठाकरेंसाठी महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक भाजपनंही मनावर घेतल्याचं दिसतंय. या निवडणुकीच्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो समोर आलाय.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्हं मिळू नये म्हणून शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेनेचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांना पाठिंबा आहे, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

या दाव्याच्या पुष्ट्यर्थ प्रतिज्ञापत्र तसेच अन्य कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. तसेच अजूनही पुरावे तसेच कागदपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असंही शिंदे गटाच्या अर्जात म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP called state leaders at Delhi after Shivsena huge rally at Shivajipark check details 07 October 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x