24 December 2024 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

१६ व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडेंची अत्यंत कमी फरकाने आघाडी

Pandharpur Mangalvedha by poll

पंढरपूर, ०२ मे | राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालातील पहिल्या फेरीत पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालकेंनी आघाडी घेतली होती. मात्र, नवव्या फेरीअखेर भाजपाच्या समाधान अवताडेंनी भगिरथ भालकेंना मागे टाकले आहे.

सकाळी आठ वाजता पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. या पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर होते. यामध्ये भगीरथ भालके यांना २३१० मते, समाधान आवताडे यांना १३७२ मते, तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना ३० मते पडली आहेत. आता नवव्या आणि दहाव्या फेरीचा निकाल हाती आल्यानंतरही समाधान आवताडेंनी आघाडी घेतल्याचं दिसून येतंय. आवताडे यांना नवव्या फेरीअखेर 2357 मतांची आघाडी मिळाली होती. तर, दहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर समाधान आवताडेंना 1838 मताची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीत चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. ज्या भागात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना मताधिक्याची अपेक्षा होती, त्याच भागात समाधान आवताडे यांनी चांगली लीड घेतली आहे.

 

News English Summary: The counting of votes for the Pandharpur-Mangalwedha Assembly by-election, which was vacated due to the death of NCP MLA Bharat Bhalke and has made the NCP as well as the BJP, is underway. Postal votes were counted in the first round of the Maharashtra by-election results.

News English Title: BJP candidate Samadhan Avtade on lead after 15 round in Pandharpur Magalvedha by poll election news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x