13 November 2024 3:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | BHEL शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: BHEL Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024 Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA PPO Number Online | तुमच्याकडे PPO नंबर आहे का, अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, असा जाणून घ्या - Marathi News Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, स्टॉक प्राईस घसरतेय, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB
x

त्यांचं ते जनाब, आपलं जनाब ते कुछ भी अनाब शनाब, क्या सही कहा ना जनाब, भाजपा-प्रेमी राज ठाकरेंची पोलखोल

BJP Politics Exposed

Janab Politics : वास्तविक, इंग्रजीत भाषेत एखाद्या व्यक्तीच्या नावा आधी मिस्टर-मिसेस (Mr, Miss), मराठी भाषेत श्री-श्रीमान आणि उर्दू भाषेत ‘जनाब’ हे शब्द आदर पूर्वक वापरले जातात. मात्र भाजप पासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणात अत्यंत चुकीच्या आणि बालिशपणे या मुद्द्यांचं राजकारण केलं जातंय. समाज माध्यमांवर देखील भाजप आणि राज ठाकरेंची खिल्ली उडवली जातेय.

एका जुन्या कॅलेंडरमुळे पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असं नमूद करण्यात आलं आहे. यावर मराठी इंग्रजीसोबतच उर्दू भाषेचाही वापर करण्यात आला आहे. तसंच यावर एका ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख जनाब उद्धव ठाकरे आणि जनाब आदित्य ठाकरे असा करण्यात आला होता.

दरम्यान शिवसेनेवर टीका केली असताना आता सोशल मीडियावर दावत-रोझा-इफ्तारचं एक पोस्टर व्हायरल झालं आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे जनाब शब्द आहे. याशिवाय पोस्टरवर भारतीय जनता पक्षाच्या इतर अनेक नेत्यांची नावं आहेत. त्यांच्या नावांपुढेही जनाब असा उल्लेख करण्यात आला आहे. ट्विटर, फेसबुकवर या पोस्टरचा फोटो व्हायरल झाला आहे.

समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या दावत-रोझा-इफ्तारचं आयोजन अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये इफ्तारची तारीख (७ जून २०१८) देण्यात आली आहे. मुंबईतील सीएसटी येथील पलटन रोड परिसरातील हज हाऊसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. त्यांच्या नावाचा उल्लेख पोस्टरवर असून त्यापुढे जनाब लिहिण्यात आलं आहे.

Latest Marathi News | BJP Politics Exposed 09 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x