बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू
चांदवड : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून चांगलेच धारेवर धरले आहे. सध्या देशभर कलम ३७० हटवण्यावरून जोरदार चर्चा रंगली असताना, भारतीय जनता पक्षाने ते बहुमताच्या जोरावर केल्याचं म्हटलं गेलं. मात्र आमदार बच्चू कडू यांनी नेमका त्याच बहुमताचा आधार घेत भारतीय जनता पक्षाला लक्ष केलं आहे.
तालुक्यातील काजीसांगवी येथे चांदवड तालुका प्रहार संघटनेच्यावतीने आयोजित शेतकरी कार्यकर्ता मेळाव्यात ते उपस्थितांना संबोधित करत होते. केवळ बहुमताच्या जोरावर ३७० व ३५ अ कलम रद्द करून भारतीय जनता पक्षाने देशहिताचा निर्णय घेतल्याचे स्वागत आहे. मात्र, याच बहुमताच्या जोरावर वर्षानुवर्षे रखडलेला शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे या मोदी सरकारला शेतकरी हिताच्या निर्णयाशी काहीही देणघेणे नसून केवळ जातीपाताच्या राजकारणात शेतकरी संपवल्याचे रोखठोक प्रतिपादन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले.
चांदवड येथील भुमिपूत्र कारगील युद्धात शहीद सुरेश सोनवणे यांच्या स्मारकास व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अपर्ण करण्यात आले. शाखा फलकाचे अनावरण झाले. यावेळी आमदार कडू यांनी सत्ताधार्यांवर चौफेर हल्लाबोल करत, ३७० कलमाचा गाजावाजा करीत असताना एकीकडे शहीदांच्या कुटुंबियांना नऊ महिन्यापासून पेन्शन नसल्याने कुटुंबियांची उपासमार होत आहे. यामुळे सत्ताधार्यांचे हेच का देश प्रेम आहे का ? पुणेगाव डाव्या कालव्याचा प्रश्न माझ्या मतदारसंघात नसला तरी मी तो सोडवल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही आमदार बच्चू कडू यांनी दिली. बच्चू कडू यांनी येणार्या विधानसभेत ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे अशा पंधरा ते वीस ठिकाणी जागा लढविण्याचा निर्धार केला. चांदवड मधून गणेश निंबाळकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहे.
पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात होता. मागील दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले आणि मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता.
दरम्यान विरोधकांनी शिवसेनेच्या मोर्चाची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली होती. त्याच विषयाला अनुसरून उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या त्या पीकविमा मोर्चा संदर्भात बच्चू कडू यांनी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. आमदार बच्चू कडू यांनी पुणे येथील कार्यक्रमात बोलताना ‘शिवसेनेचे नेते हे विमा कंपन्यांविरोधात मोर्चे काढत आहेत. मात्र सरकारमध्ये असताना ते शिवसेनेचे मंत्री झोपा काढतात का?’ असं म्हणत बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली केली. तसेच पुढे बोलताना राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच नुकसान झाले आहे. मात्र अनेक दिवस झाले तरी सुद्धा पिकविम्याचे पैसे मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार काहीही करताना दिसत नाही, असंही बच्चू कडू त्यावेळी म्हणाले होते.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News